मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने मोठा अनर्थ टळला, पिकअप चालक जखमी

मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने मोठा अनर्थ टळला, पिकअप चालक जखमी

Sanjay Rathod Car Accident : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात (Accident ) झाल्याची बातमी समोर आली आहे. अपघातानंतर गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस जवळील कोपरा येथे हा अपघात घडला आहे. राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

पिकअपचा ड्रायव्हर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार संजय राठोड 3 ऑक्टोबर रोजी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. रात्री प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर लगेच गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे संजय राठोड बचावले आहेत. या अपघातात पिकअपचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला आहे.

सुवर्णदिन! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे होते. ते रात्री 2 ते अडीच वाजेदरम्यान ते पोहरादेवी येथून निघाले. ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. मात्र, आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली अन् त्यामध्ये ही घटना घडली आहे.

पिकअपचा चालक जखमी

हा अपघात चांगलाच भीषण होता. या अपघातात पिकअप तसेच संजय राठोड यांच्या वाहनाची मोठी हानी झाली आहे. अपघातानंतर पिकअप वाहन पलटी झाले. ज्यामुळे पिअकपचा चालक जखमी झाला. रात्री दोन ते अडीच वाजता ही घटना घडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube