उद्धव ठाकरेंच्या क्लीनचीटमुळेच संजय राठोड मंत्री, माझा लढा संपलेला नाही; चित्रा वाघ कडाडल्या
Chitra wagh : पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकास आघाडीत असताना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांना आक्रमक भूमिका घेतली होती. सध्या राठोड हे महायुतीत मंत्री आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीतही राठोड यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून चित्रा वाघ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. मात्र, संजय राठोड यांना ज्या काही गोष्टी मिळत आहेत, त्या केवळ उद्धव ठाकरेंमुळेचं मिळत असल्याचं वाघ यांनी म्हटलं.
संदेशखली प्रकरणाच्या निषेधार्थ चित्रा वाघ कराडमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी अनेक विषयांवर संवाद साधला. दरम्यान,यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांच्या जागी मंत्री संजय राठोड यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबबत प्रश्न विचारला असता वाघ यांनी संतप्त होत आपली भूमिका जाहीर केली. त्या म्हणाल्या की, राठोड यांना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना क्लीन चिट दिली होती. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी राठोड यांना कोणत्या आधारावर क्लीन चिट दिली, हे कधीतरी त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. त्यांनी क्लीन चिट दिली नसती तर ते मंत्री झाले असते का? माझी लढाई चालूच आहे, असं वाघ म्हणाल्या.
Tahir Raj Bhasin: ये काली काली आंखें वर अभिनेता थेटच म्हणाला, “सीझन 2 मधील…”
राठोड यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार की नाही, कोणाला मिळणार, कोणाला तिकीट देण्यता येणार या सगळ्या गोष्टी जर तरच्या गोष्टी आहेत. पण माझा लढा सुरूच आहे. माझी केस आहे, ती मी लढणारच आहे. ती केस उच्च न्यायालयात सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या क्लीन चिटमुळे संजय राठोड उभे आहेत. ज्या दिवशी त्यांचा शपथविधी झाला, त्या दिवशीही मी राठोडांविरोधात बोलले आहे, माझी लढाी संपलेली नाही. हे तेव्हाही बोलले मी आणि आजही बोलते आहे, असं वाघ म्हणाल्या.
संजय राठोड यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास विरोधात प्रचाराला जाणरा का? या प्रश्नाचे उत्तर देण्यास चित्रा वाघ यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या, राठोड यांच्याबाबत मला दररोज प्रश्न विचारले जात आहेत, यावर मी माझी भूमिका स्पष्ट करते असं म्हणत राठोड ज्या ठिकाणी आहेत, ते तिथे केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आहेत, असं त्या म्हणाल्या.