महाविकास आघाडीचं जागावाटप कधी फायनल होणार? नाना पटोलेंनी थेट तारीखच सांगितली

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी फायनल होणार? नाना पटोलेंनी थेट तारीखच सांगितली

Nana Patole : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात राज्यातील महाविकास आघाडीतील (MVA)मित्रपक्षातील लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही 42 जागा जिंकू असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

The Indrani Mukerjea Story ला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती, नेटफ्लिक्सलाही फटकारले

नाना पटोले म्हणाले की, कॉंग्रेसचा शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असा जागावाटपावरुन कोणताही वाद नाही. आमची लढाई ही सरळसरळ भाजपच्या विरोधात आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची ती तयारी सुरु झाली आहे. त्याचबरोबर 27 आणि 28 फेब्रुवारीला आम्ही एकत्र बसून अंतिम निर्णयावर घेणार असल्याचेही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

‘जयंत पाटील शेवटचा डाव आखणार..,’;’दिल्लीसुद्धा पवारांना घाबरते’ म्हणणाऱ्यांना विखेंचा मार्मिक टोला

महाविकास आघाडी म्हणून आम्ही देशातलं तरुणांच्या विरोधी, शेतकरी विरोधी, गरिबांच्या विरोधातलं सरकार कसं घालवायचं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार कसं घालवायचं? आणि याचं प्लॅनिंग महाराष्ट्रातूनच कसं होऊ शकतं? याचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही आजच्या मिटींगमधून केलं असल्याचं यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं.

पटोले यांनी यांनी सांगितले की, आम्ही मेरिटवर लढणार आहोत. ज्या ठिकाणी कॉंग्रेस जिंकेल त्या ठिकाणी कॉंग्रेस लढेल, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी जिंकू शकेल त्या ठिकाणी ते लढतील आणि ज्या ठिकाणी शिवसेना जिंकेल त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट लढेल असं नियोजन असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर वंचित आघाडीसोबत देखील चर्चा झालेली आहे. त्यांचीही आम्ही वाट पाहात आहोत. या आठवड्यात त्यांच्याशी देखील चर्चा पूर्ण होईल आणि ते देखील आमच्यासोबत राहतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही यावेळी नाना पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube