Devendra Fadanvis : अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अर्थ पंतप्रधानांना हीन बोलणे नाही; फडणवीसांनी वागळेंना फटकारले !

Devendra Fadanvis : अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अर्थ पंतप्रधानांना हीन बोलणे नाही; फडणवीसांनी वागळेंना फटकारले !

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ( Nikhil Wagale ) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे. फडणवीस म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना हीन भाषेत बोलणं हा होत नाही. असं म्हणत फडणवीसांनी वागळेंवर टीका केली. ते विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेमध्ये बोलत होते.

Tahir Raj Bhasin: ये काली काली आंखें वर अभिनेता थेटच म्हणाला, “सीझन 2 मधील…”

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, निखिल वागळे यांना पोलिसांनी सांगितलं होतं की, आम्ही रूट क्लिअर करत आहोत. तोपर्यंत तुम्ही थांबा. आम्ही सांगतो त्या रूटने तुम्ही जा. मात्र त्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. त्यामुळे त्यांच्यावरती हल्ला झाला. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी वाचवले असं सांगितलं जात त्यांचे आभार. मात्र वागळे यांच्यासोबत गणवेश नसलेले पोलीस होते. त्यांनी तात्काळ कारवाई केली.

मुख्यमंत्र्यांनी फोन करुनही भुसेंनी जाणीवपूर्वक काम घेतलं नाही, ते उद्धटपणे माझ्याशी…; थोरवेंनी सगळंच काढलं

त्यानंतर दहा जणांना अटक करण्यात आली. काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली. या हल्ल्याचं मी समर्थन करत नाही. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना हीन भाषेत बोलणं हा होत नाही. त्यामुळे वागळे यांच्यावर झालेला हल्ला चुकीचाच आहे. मात्र त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणताही हल्ला झालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वापरण्यात आलेल्या शब्दांचा मी निषेध करतो. असं म्हणत फडणवीसांनी वागळेंवर टीका केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यातील ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस संरक्षणात कार्यक्रम स्थळी येत असलेल्या निखिल वागळे यांची गाडी फोडली. मात्र या घटनेनंतर देखील पोलीस संरक्षणामध्ये निखिल वागळे हे कार्यक्रम स्थळी दाखल झाले. त्यांनी या कार्यक्रमात विस्फोटक असं भाषण केलं. यावेळी त्यांनी हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला. तसेच त्यांनी भाजपसह पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील जोरदार टीका केली होती. त्यावरून विरोधकांनी सरकार आणि भाजपला चांगलेच घेरले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube