माफियांना पोसणारा देवेंद्र फडणवीसच; निखिल वागळेंचा थेट नाव घेत घणाघात

माफियांना पोसणारा देवेंद्र फडणवीसच; निखिल वागळेंचा थेट नाव घेत घणाघात

Nikhil Wagale On Devendra Fadnvis : माफियांना पोसणारा देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnvis) असल्याचा घणाघात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात निखिल वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ जाहीर सभेचं आयोजन करण्यात येत आहे. अहमदनगरमध्ये आज निर्भय बनो कार्यक्रम पार पडला. यावेळी माफिया आणि अहमदनगरच्या गुंडगिरीविरोधात निखिल वागळे यांनी थेट भाष्य केलं आहे. अहदमनगरमध्ये माफियांविरोधात नागरिकांनी मोठा मोर्चा काढावा, मला बोलवा एक पदयात्राच काढू, नगरच्या पत्रकारांनी माफियाविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन निखिल वागळे यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशात ‘सपा’ला धक्का! निवडणुकीआधीच ‘या’ दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

निखिल वागळे म्हणाले, अहमदनगरमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हे घडले आहेत. नगरमध्ये वकिलांची हत्या, खुनी हल्ले, जीवे मारण्याचे प्रयत्न केले जात आहे. अशा माफियांना आणि गुंडांना देवेंद्र फडणवीस यांनीच पोसलं असल्याचा घणाघात निखिल वागळेंनी केला आहे.

फडणवीसांना दिली का कधी नोटीस?

अहमदनगरमध्ये येताच पोलिसांनी मला आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात बदनामीकारक बोलू नका,अशी नोटीस मला देण्यात आली आहे. पण तेलंगणाचा आमदार टी राजासिंग महाराष्ट्रात येऊन प्रक्षोभक भाषण करतो. त्याच्यासोबत नारायण राणेंचा एक मुलगा असतो. पोलिसांना एकच सांगतो टी राजासिंग, राणेला, देवेंद्र फडणवीसांना कधी नोटीसा का देत नाहीत? असा रोखठोक सवाल निखिल वागळेंनी पोलिसांना केला आहे.

अंकितांनी तीनच वाद सांगितले; पण पवार-पाटील घराण्यात संघर्षाची वात 50 वर्षांपूर्वीच पेटली आहे…

नगरचे पोलिस सत्ताधाऱ्यांचे गुलाम…
टी राजासिंग, देवेंद्र फडणवीस, राणे यांच्यासह इतर नेते भाषणे करत असतात. त्यांना कधीही नोटीसा दिलेल्या नाहीत. तर मग 45 वर्षे पत्रकार असणाऱ्या निखिल वागळेला तुम्ही नोटीस देता. तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. नगरचे पोलिस सत्ताधाऱ्यांचे गुलाम जसे पुण्याचे भाजपचे गुलाम आहेत. माझ्यावरील हल्ला पोलिसांच्या संगनमताने झाला आहे. मला नोटीस बजावून पोलिस संग्राम जगताप यांचे हस्तक असल्याचा आरोपही वागळे यांनी केला आहे.

वागळेंनी भाषणात नोटीसच वाचून दाखवली….
नगरला येईपर्यंत मला पंडित नेहरु, आचार्य नरेंद्र माहित होते. आज पोलिसांनी एका माणसाची ओळख मला करुन दिली त्याचं नावही मला माहित नव्हतं. त्याचं नाव आमदार संग्राम भैय्या जगताप. पोलिसांनी पत्रात लिहिलंयं, पोलिसांनी पत्रात संग्रामभैय्या जगताप म्हटलं आहे त्यांनी संग्राम जगताप म्हटलं पाहिजे. हे पोलिसांचे भैय्या आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी खोटी बदनामीकारक भाषा करुन नये, तुमच्या विधानामुळे तेढ निर्माण झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. संग्राम जगतापांवर बोलू नये असं सांगत आहेत. तो छोटा माणूस आहे गावगुंडांबद्दल मी फारसं जास्त काही बोलत नाही. मी राष्ट्रीय पातळीवरच्या गुंडांवर बोलतो, असंही निखिल वागळे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज