उत्तर प्रदेशात ‘सपा’ला धक्का! निवडणुकीआधीच ‘या’ दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

उत्तर प्रदेशात ‘सपा’ला धक्का! निवडणुकीआधीच ‘या’ दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीला आणखी एक (Uttar Pradesh) धक्का बसला आहे. पक्षातील दिग्गज नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची (Lok Sabha Election) साथ सोडली आहे. मौर्य यांनी आज समाजवादी पार्टी आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना दिला. तसेत विधानपरिषदेच्या सभापतींनाही पत्र पाठवले.

मौर्य म्हणाले, राजधानी नवी दिल्लीत 22 फेब्रुवारी रोजी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पुढील निर्णय घेण्यात येईल. संघटनेतच भेदभाव केला जात असेल, राष्ट्रीय महासचिवाचे प्रत्येक वक्तव्य वैयक्तिक ठरत असेल आणि पदांमध्येही भेदभाव होत असेल तर मी या भेदभावाविरुद्ध लढणारा आहे. अशा परिस्थितीत पदावर राहण्याचे काही कारणही राहत नाही. त्यामुळे सर्व घटनांचा उल्लेख करत 13 फेब्रुवारीलाच राष्ट्रीय अध्यक्षांना राजीनाम्याचे पत्र पाठवले होते. आता कार्यकर्तेच ठरवतील की आगामी काळात त्यांना काय करायचे आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले.

‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का! जागावाटपाच्या चर्चा फेल; ‘समाजवादी पार्टी’चा स्वबळाचा नारा?

मी स्वच्छ राजकारण करण्यात विश्वास ठेवतो. वैचारिक मतभेद झाल्याने मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीबरोबर माझे वैचारिक मतभेद आहेत. अखिलेश यादव सध्या समाजवादी पार्टीच्या विचारधारेविरोधात जात आहेत. मी मुलायम सिंह यादव यांच्याबरोबरही काम केले आहे. ते एक कट्टर समाजवादी नेते होते. आता जे लोक त्यांचा वारसा चालवत आहेत ते मात्र मुलायम सिंह यादव यांच्या विचारांवर चालत नाही. हे मोठे दुर्दैव आहे, अशी खंत मौर्य यांनी व्यक्त केली.

स्वामी प्रसाद मौर्य 1991 ते 1996 या काळात जनता दलात होते. 1996 ते 2016 या वीस वर्षांच्या काळात बहुजन समाज पार्टीत होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने त्यांना मंत्रिपदही दिलं. 2022 मध्ये मात्र त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीत प्रवेश केला. अखिलेश यादव यांनी त्यांना राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती दिली. आता त्यांनी समाजवादी पार्टीचा राजीनामा देत नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.

Lok Sabha Election : ‘ममता, नितीशची वेगळी वाट, केजरीवालही तयारीत’ ‘इंडिया’कडं राहिलं काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज