धक्कादायक! पॉप्युलर गेम खेळताना मुलाचा झाला मृत्यू; वाचा, नक्की काय घडलं?
उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे मोबाईलच्या व्यसनावर आणि लहान मुलांवरून चर्चा सुरू झाली.

लहान मुलांच्या आरोग्यासंबंधी चिंताजनक बातमी समोर आली आहे. (Gaming) मुलांना मोबाईल गेमचं इतकं वेड लागलं की पालकांना हे वेड कसं सोडवावं याचं मोठं कोडं पडलं आहे. मोबाईल फोनच्या वेडातून एका मुलाचे प्राण गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने मोबाईल गेमिंगच्या व्यसनावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारण एका १३ वर्षांच्या मुलाचा कथितपणे फ्री फायर गेम खेळताना मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे मोबाईलच्या व्यसनावर आणि लहान मुलांना मोबाईल द्यावा की नाही यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. येथे एका मुलाचा फ्री फायर गेम खेळताना मृत्यू झाला आहे.तज्ज्ञांच्या मते हे ‘सडन गेम डेथ’चं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. सडन गेम डेथ प्रकरण म्हणजे हे असे प्रकरण असते. ज्यात सातत्याने बराच काळ गेळ खेळताना अचानक त्यानंतर लोकांचा मृत्यू होतो.
नांदेड हादरलं! अनैतिक संबंध टिकवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पत्नीचं मोठं कांड; धक्कादायक सत्य बाहेर
गेम खेळताना हा मुलगा बेडवर झोपला होता. घरातल्यांना आधी वाटलं हा झोपला आहे म्हणून त्याच्या कुटुंबियांनी त्याला उठवलं नाही. काही वेळानंतर जेव्हा वारंवार जागे केल्यानंतरही तो उठला नाही तेव्हा मुलाचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर परिसरात घबराट पसरली. गेल्या काही वर्षांपासून टीनेएजर पिढीत मोबाईल गेमिंग खूपच प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे सतत मोबाईल पाहात राहिल्याने झोपचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
वैद्यकीय संशोधनानूसार हे समोर आलं आहे की, अनेक तास न थांबता गेमिंग केल्याने आरोग्यावर प्रचंड गंभीर परिणाम होत अनेक आजार होत आहे. सातत्याने एकाच स्थिती बसल्याने फुप्फुसात रक्त्याच्या गाठी जमू लागतात. गेम खेळताना मेंदूवर सातत्याने तणाव आल्याने हार्टबिट्स असमान्य होणं आणि ब्रेन हॅमरेजचा धोकाही निर्माण होत आहे. तज्ज्ञांच्या म्हणणं आहे की सडन गेमर डेथ प्रकरणात कोणतीही जखमी होत नाही. परंतु, यात मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव होतो.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन आणि अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार ही एक स्थिती इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरशी जोडलेली आहे. ज्यात गेमिंगची सवय मानसिक आरोग्य आणि पॉश्चर आणि हार्टच्या एक्टीव्हीटीला प्रभावित करते. १९८२ नंतर आतापर्यंत जगभरात सडन गेम डेथच्या २४ केस रिपोर्ट झाल्या आहेत. अशा प्रकरणात मरणाऱ्यांचे वय ११ ते ४० वयाच्या दरम्यान होते. यातील बहुतांशी प्रकरणे सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियातील आहेत.