बिहारमध्ये घोषणांचा पाऊस ! प्रत्येक घरातील एकाला सरकारी नोकरी देणार; तेजस्वीची गेमचेंजर घोषणा ?
Tejashwi Yadav इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल. वीस दिवसांमध्ये असा कायदा केला जाईल.

Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक (Bihar Elections 2025) जाहीर झाल्यानंतर एकामागून एक राजकीय घोषणा सुरू झाल्या आहेत. बिहारमधील एनडीए सरकारने 75 लाख महिलांच्या बँक खात्यावर दहा हजार रुपये वर्ग केले आहेत. या योजनेला मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असे नाव दिले आहे. योजनेमुळे एनडीएकडे महिला व्होट बँक आकर्षित होणार आहेत. परंतु या योजनेला काउंटर करणारी मोठी घोषणा राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी गुरुवारी केली आहे.
इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वीस दिवसांमध्ये असा कायदा केला जाईल, अशी घोषणा तेजस्वी यादवने केली आहे.
वीस महिन्यांत सर्वांना नोकऱ्या देणार
माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, बिहारमध्ये आता रोजगाराचे पुनरुज्जीवन होईल. राज्यातील ज्या कुटुंबाकडे सरकारी नोकरी नाही अशा प्रत्येक कुटुंबाला नवीन कायदा करून सक्तीची नोकरी दिली जाईल. सरकार स्थापन होताच वीस दिवसांच्या आत कायदा लागू करू. त्यानंतर वीस महिन्यांच्या आत, बिहारमध्ये असे एकही घर राहणार नाही ज्याला सरकारी नोकरी नसले. (Bihar Assembly Election 2025 Tejashwi Yadav RJD)
साहित्यासाठीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा!हंगेरीच्या लास्जलो क्रास्नाहोरकाईंचा दूरदर्शी आणि कलात्मक लेखनासाठी गौरव
एनडीए सरकारवर जोरदार टीका
आताचे सरकार हे गेल्या वीस वर्षात तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरलंय. गेल्या विधानसभा निवडणुकीत मी सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. माझ्या सरकारच्या काळात पाच लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. मी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असता तर काय शक्य झाले असते याची तुम्ही कल्पना करू शकता, असा दावा तेजस्वी यादव यांनी केलाय. बिहारमधील तरुणांनी आता खोट्या आश्वासनांऐवजी ठोस रोजगार धोरणाची अपेक्षा करावी. प्रत्येक कुटुंबासाठी रोजगाराची हमी सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे. राज्यातील एनडीए सरकारला कॉपीकॅट सरकार आहे, अशी टीका तेजस्वी यादवने केलीय.
घायवळच्या भावाला बंदूक परवाना देण्याचा निर्णय सब कॉन्सियस माईंडने घेतला : योगेश कदम
दोन टप्प्यात निवडणूक
बिहार विधानसभेची सदस्यसंख्या 243 आहे. या राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 121 जागांसाठी 6 नोव्हेंबरला, तर 122 जागांसाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.