साहित्यासाठीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा!हंगेरीच्या लास्जलो क्रास्नाहोरकाईंचा दूरदर्शी आणि कलात्मक लेखनासाठी गौरव
Nobel Prizes for Literature यासाठी हंगेरीचे लेखक लास्जलो क्रास्नाहोरकाई यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Nobel Prizes for Literature announced! Hungary’s Laszlo Krasznahorkai honored for visionary and artistic writing : साहित्यासाठीच्या 2025 च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.यासाठी हंगेरीचे लेखक लास्जलो क्रास्नाहोरकाई यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.स्वीडनची स्वीडश अकॅडमी यांनी गुरुवारी9ऑक्टोबर रोजी या पुरस्कारांची घोषणा केली.यांच्या लेखनाची ताकद ही दहशतवादाच्या काळामध्ये देखील पाहायला मिळाली.
सांगली जिल्हा बँक नोकर भरतीत जयंत पाटलांना झटका, फडणवीसांकडून स्थगिती देत नव्याने भरतीचे निर्देश
या पुरस्कारामध्ये लास्जलो क्रास्नाहोरकाई यांना 11 मिलियन स्विडीश क्रोना सोन्याचं पदक आणि सर्टिफिकेट देऊन गौरव केला जाणार आहे.त्यांना या पुरस्काराने 10सेंबर रोजी स्टॉकहोम या ठिकाणी सन्मानित केले जाईल.तर या अगोदर यांना 2015 मध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज आणि 2019 मध्ये नॅशनल बुक अवॉर्ड फॉर ट्रान्सलेट लिटरेचर देखील मिळाला आहे.
https://x.com/NobelPrize/status/1976241486552531287
दरम्यान स्वीडिश अकॅडमीच्या नोबेल समितीकडून 1901 ते 2024 या दरम्यान 121 विजेत्यांना 117 वेळा साहित्य पुरस्कार प्रदान केले गेले आहेत. गेल्या वर्षी नोबेल पुरस्कार दक्षिण कोरिया लेखिका हान कांगयांना देण्यात आला होता. तरी यावर्षीच्या पुरस्कारांमधील त्या आठवड्यातील हा चौथा पुरस्कार आहे.या अगोदर चिकित्सा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र साठीचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
घायवळच्या भावाला बंदूक परवाना देण्याचा निर्णय सब कॉन्सियस माईंडने घेतला : योगेश कदम
दरम्यान त्यांच्या साहित्याबद्दल सांगताना स्वीडिश अकॅडमीने म्हटलं की, जगातील विध्वंस, भीती यामध्ये देखील त्यांच्या कलेची ताकद पाहायला मिळते. मध्य युरोपीय परंपरांचे ते महाकाव्य लेखक आहेत. त्यांची पहिली कादंबरी 1985 मध्ये प्रकाशित झाली होती. सैटानटैंगो असं तिचं नाव होतं. हे कादंबरी साम्यवादाच्या पतनाच्या काही दिवस अगोदर हंगेरीच्या ग्रामीण भागात वाळवंटात राहणाऱ्या बेसहारा नागरिकांच्या समूहावर आधारित होती.