महाराष्ट्र पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव; राज्यातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदकं जाहीर

Maharashtra Police केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्रातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदकं जाहीर केले.

Maharashtra Police

Maharashtra Police’s honored 75 police officers from the state awarded President’s Medals : आज 26 जानेवारी 2026 रोजी देशाचा 77 व प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या दिवशी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील 874 पोलिसांना राष्ट्रपती पदकं जाहीर केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 75 पोलिसांचा समावेश आहे.

दिल्लीच्या परेडमध्ये गणपती बाप्पा! महाराष्ट्राचा चित्ररथ घडवणार गणेशोत्सवाचं दर्शन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये पोलीस दलामध्ये दाखवलेले शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्ता पूर्ण कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये देशासह राज्यातील मुंबई पोलीस दलातील राजू जैन, महेश पाटील, पुरुषोत्तम कराड, महेश तावडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सामना जिंकला! भारतानं तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडला 8 विकेटनं पाणी पाजल

तर या पोलिसांपैकी 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना शौर्य पदक चार पोलिसांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर 40 पोलिसांना गुणवत्ता पूर्ण कामगिरीबद्दल पदके जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील ,उपायुक्त बाळकृष्ण यादव, एसीपी सायरस इराणी, विठ्ठल कुबडे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल गौरविण्यात येणार आहे.

 

follow us