दिल्लीच्या परेडमध्ये गणपती बाप्पा! महाराष्ट्राचा चित्ररथ घडवणार गणेशोत्सवाचं दर्शन

Ganeshotsav यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ हा महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडवत आहे.

Ganeshotsav

Republic Day 2026 Maharashtra Tableau Ganeshotsav : आज 26 जानेवारी 2026 रोजी देशाचा 77 व प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्या दिवशी दिल्लीतील कर्तव्यपथावर लष्करी पथसंचलन होणार आहे. यामध्ये विविध राज्यांचे चित्ररथ हे तेथील संस्कृतींचा प्रतिनिधित्व करत असतात यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ हा महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडवत आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव; राज्यातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदकं जाहीर

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर हा चित्ररथ सजवण्यात आला आहे. ज्यामध्ये अष्टविनायकांच्या प्रतिकृती ढोल ताशा आणि गणपती बाप्पांची मूर्ती दिसणार आहे. गणेशोत्सवाचा असंख्य लोकांना आत्मनिर्भर बनवत आहे. यातूनच गणेशोत्सव हा आत्मनिर्भरतेचा प्रतिक असल्याची संकल्पना या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी माहिती दिली. लोकांनी एकत्र यावया उद्देशातून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आता कोट्यावधी रुपयांचा उलाढाली करणारा ठरत आहे. यामध्ये मूर्तिकार आणि सजावट करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध होत असून एक मोठी आर्थिक साखळी पूर्ण होत आहे.

सामना जिंकला! भारतानं तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडला 8 विकेटनं पाणी पाजल

देशभरात प्रजासत्ताक (Republic) दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देशात यावेळी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जीआल. याच दिवशी भारतीय संविधान लागू झाले होते. म्हणजे एका अर्थी 26 जानेवारी 1950 रोजीपासून देशात सार्वभौव, लोकशाही गणराज्य राष्ट्राची स्थापना झाली होती. दरम्यान यावेळचा प्रजासत्ताक दिवस खूपच विशेष असणार आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण; धुरंदरमधील अभिनेत्याला अटक

या दिवशी नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भारतीय हवाई दल वेगवेगळ्या हवाई कसरती दाखवणार असून ऑपरेशन सिंदूरच्या थिमवर या कसरती असणार आहेत. या कसरतींमध्ये भारताच्या हवाई दलात असलेली राफेल, सुखोई-30 मिग-29 यासारखी लढाऊ विमाने सहभागी होतील. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य अशा परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या परेडमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता, सैन्याची शक्ती, वैज्ञानिक प्रगती, भारताची आत्मनिर्भर भारत मोहीन यांची झलक पाहायला मिळणार आहे.

follow us