संभाजीनगरमध्ये राडा; कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांना घरात घुसून मारहाण, माफीनाम्यानंतरही जमाव संतप्त

nivrutti maharaj wadekar-संतप्त झालेल्या जमावाने निवृत्त महाराज वाडेकरांच्या घरात घुसून त्यांना जबर मारहाण करून दहशत निर्माण करण्यात आली.

  • Written By: Published:
Sambhaji Nagar Nirutti Maharaj

छत्रपती संभाजीनगर: चंद्रग्रहणाबाबत एका महिलेबाबत बोलताना छत्रपती संभाजीनगरमधील कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांचा संयम सुटला होता. संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर निवृत्त महाराज वाडेकर यांनी माफी मागितली होती. त्यानंतरही संतप्त झालेल्या जमावाने निवृत्त महाराज वाडेकरांच्या घरात घुसून त्यांना जबर मारहाण करून दहशत निर्माण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. (chhatrapati-sambhajinagar-news-attack-on-kirtankar-nivrutti-maharaj-wadekar-over-controversial-statement)

नुकतच चंद्रग्रहण झालेले आहे. चंद्रग्रहणामध्ये काही नियम पाळले जातात. परंतु एका महिलेने चंद्रग्रहणामध्ये भाज्या, फळे कापले होते. तो व्हिडिओ त्या महिलेने सोशल मीडियावर टाकला होता. परंतु त्या महिलेने व्हिडिओमध्ये पती व लहान बाळाला दाखविले होते. परंतु बाळाचा गालावर काळा टिळा लावलेला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्या महिलेला ट्रोलही करण्यात आले होते. त्यानंतर कीर्तनकार निवृत्त महाराज वाडेकर यांनी त्या महिलेबाबत बोलले होते. तू फळं काप नाही तर काहीपण काप असे ते म्हणाले. तसेच ती महिला हिंदू धर्मातील नाही. ती महिला दुसऱ्या धर्मातील आहे, असे वाडेकर महाराज म्हणाले. तसेच काही दाखले हिंदू धर्मातील दिले होते.

वाडेकर महाराज यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर वाडेकर महाराज यांना आपली भूमिका स्पष्ट करत माफी मागीतली होती. माझा कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. वारकरी संप्रदाय हा सर्वांना एकत्र घेणारा आहे. तरीही माझ्या विधानामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी क्षमा मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, असा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला होता.


गांधेली येथील जमाव संतप्त

वाडेकर यांनी माफी मागितली होती. त्यानंतर गांधेली येथील जमाव संतप्त झाला झाला. जमाव थेट वाडेकर यांच्या घरात घुसला आणि त्यांना बाहेर खेचून बेदम मारहाण केली. त्यांना घराच्या बाहेर काढून मारहाण करण्यात आली आहे. वाडेकर यांच्या घरात वृद्ध आई-वडिल, पत्नी आणि लहान मुलगी उपस्थित होते. त्यांना कीर्तनकार वाडेकर यांना वाचवायचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाने त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे कुटुंब भयभीत झाले आहे. संपूर्ण हल्ला हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

follow us