Republic Day : कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व सोहळा, पाहा पथसंचलनाचे फोटो

  • Written By: Published:
1 / 8

Republic Day : देशात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत.

2 / 8

पीएम नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांसह राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

3 / 8

यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांनी तिरंगा फडकवला. पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यासह सर्व मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली.

4 / 8

दरवर्षी सैन्याचा बँड वाजवून परेडला सुरुवात होते. मात्र, यंदा पारंपरिक वाद्य वाजवून परेडला सुरुवात झाली.

5 / 8

या कार्यक्रमाला केंद्र सरकारमधील मंत्री, सरकारी अधिकारी यांच्यासह देशभरातील नामवंत व्यक्ती हजर होते

6 / 8

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांतर्फे शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन केले गेले.

7 / 8

यावेळी कर्तव्यपथावर चित्ररथांचीही परेड पार पडली. या चित्ररथांमधून देशाच्या विविधतेचं दर्शन घडलं.

8 / 8

महाराष्ट्राच्या चित्ररथाची छत्रपती शिवराय, जिजाऊ, राजमुद्रा अशी थीम यंदा होती. यावेळी तीनही दलांचं संचलन पाहण्यासारखं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube