झाकीर खानच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! झाकीर तब्बल 5 वर्षांच्या ब्रेकवर! म्हणाला…

Stand-up comedian Zakir Khan आता पुढील पाच वर्ष त्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. त्याने 5 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला आहे.

Stand Up Comedian Zakir Khan

Stand-up comedian Zakir Khan announced 5 years break from comedy for Health and Personal Life : स्टॅन्डअप कॉमेडीच्या विश्वातील प्रसिद्ध आणि तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेलं नाव म्हणजे स्टॅन्डअप कॉमेडीयन झाकीर खान. पण याच झाकीर खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे झाकीर खान आता पुढील पाच वर्ष त्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. त्याने 5 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला आहे.

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या झाकीर खान हा देश-विदेशांमध्ये त्याचे स्टॅन्डअप कॉमेडीचेशओ करत आहे. याच दरम्यान त्याचा नुकताच एक शो हैदराबादमध्या पार पडला. त्यावेळी त्याने ही मोठी बातमी त्याने त्याच्या चाहत्यांशी शेअर केला आहे. यावेळी त्याने आपल्या या ब्रेक घेण्यामागील कारण देखील सांगितले आहे.

https://www.instagram.com/stories/zakirkhan_208/3814074263963989608/?hl=en

नेमकं काय म्हणाला झाकीर खान?

मी एका मोठ्या ब्रेकवर जात आहे. हा ब्रेक कदाचित हा ब्रेक 2028, 29 किंवा 2030 पर्यंत असू शकतो. मी हा ब्रेक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सोडवण्यासाठी हा ब्रेक घेणार आहे. असं म्हणत त्याने प्रेक्षकांना ही माहिती दिली. त्याच्या शो मधील ही भावनिक क्लिप व्हायरल होत आहे.

20 जून पर्यंत उरकणार सर्व शो!

तसेच याबाबत त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी ठेवली आहे. ज्यामध्ये त्याने ब्रेकवर जाण्याअगोदर तो त्याचे कॉमेडी शो कशाप्रकारे उरकणार आहे. त्याबाबत माहिती दिली. त्यात तो म्हणाला आहे की, माझे पुढील सर्व कॉमेडी शो हे 20 जून पर्यंत होणार आहेत. त्यामधील काही शहरांमध्ये मी येऊ शकत नाही. त्याचा तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. माझ्यावर प्रेम करण्यासाठी धन्यवाद.

follow us