वजन वाढवण्याचं चॅलेंज जीवावर बेतलं; फिटनेस इन्फ्लुएन्सरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शियन फिटनेस प्रशिक्षक आणि इन्फ्लुएन्सर दिमित्री नुयानजिन याचे बिंज इटिंग चँलेजमध्ये सहभागी झाल्यानंतर निधन झाले आहे.
Fitness Influencer died : रशियन फिटनेस प्रशिक्षक आणि इन्फ्लुएन्सर दिमित्री नुयानजिन (Dmitry Nuyanjin) याचे बिंज इटिंग चँलेजमध्ये सहभागी झाल्यानंतर निधन झाले आहे. रशियातील ओरेंबर्ग शहरातील ३० वर्षाच्या दिमित्री एका खाण्याच्या खाण्याच्या रुटीन मार्फत वजन वाढवण्याचं चॅलेंज फॉलो करत होता. मात्र हे चॅलेंजच त्याचा मृत्यूचं कारण बनलंय…हे चॅलेंज सुरू असताना त्याचा झोपेतच मृत्यू झालाय. या चॅलेंजमध्ये किमान 25 किलो वजन वाढवण्याचं (Weight Gain) उद्दीष्ट त्याने समोर ठेवलं होतं. हेच चॅलेंज त्याच्यासाठी घटक ठरलं असून त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) मृत्यू झालाय. याच चॅलेंजचा भाग म्हणून त्याने अनेक आठवडे फक्त फास्टफूड खाल्ले. त्याच म्हणणं असं होतं की, त्याच्यासोबतच त्याचे क्लायंट देखील हे चॅलेंज फोल्लो करतील असा त्याचा समज होता. तो दररो फास्टफूडच्या माध्यमातून 10 हजारांपेक्षा अधिक कॅलरीज घेत होता.
मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने वर्कआउट केला नव्हता. त्याच्या मित्रांनी सांगितलं की त्याची प्रकृती ठीक नव्हती. तो डॉक्टरांना भेटणार देखील होता. मात्र त्याच रात्री झोपेत त्याचा मृत्यू झाला. 18 नोव्हेंबर रोजी त्याने शेवटची इंस्टाग्राम पोस्ट केली होती. त्यात तो चिप्स खाताना दिसून येतोय. हे चॅलेंज घेतल्यानंतर त्याने तब्बल 13 किलो वजन वाढवले होते. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर बऱ्याच जणांनीं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बऱ्याच जणांनी त्याच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करत शोक व्यक्त केलाय. अनेक जणांनी म्हटलंय की, या फिटनेस इन्फ्लुएन्सरचा (Fitness Influencer) मृत्यू हा इतर जे लोक असे चॅलेंज फॉलो करतात त्यांच्यासाठी मोठा धडा आहे.
रवींद्र चव्हाणांसोबतच्या संबंधामुळे मला टार्गेट केलं जातंय – विजय केनवडेकर
यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही उलट-सुलट गोष्टी ट्राय कारण तुमच्या जीवावर देखील बेतू शकत. आजकालची तरुणाई सोशल मीडियावर बऱ्याच फिटने इन्फ्लुएन्सरला फॉलो करत असते. आपला फिटनेस देखील त्यांच्याप्रमाणे झाला पाहिजे अशी अपेक्षा ते करत असतात. अशा विचारातूनच ते कसलाही विचार न करता ते सांगतात त्याप्रमाणे लाइफस्टाइल फॉलो करतात आणि अशा घटना घडतात. त्यामुळे हेल्थच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्याअगोगार डॉक्टर किंवा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
