Viral Penguin : मृत्यूची दिशा की, स्वतःचा शोध? कळप सोडून एकट्या निघालेल्या पेंग्विनची गोष्ट…

धावपळीच्या जगात अनेकांना कामाचा ताणामुळे गोंधळ नसेल, मोबाईल नेटवर्क नसेल असेल ती फक्त शांतता अशा ठिकाणी जाण्याची इच्छा होते.

  • Written By: Published:
Viral Penguin : मृत्यूची दिशा की, स्वतःचा शोध? कळप सोडून एकट्या निघालेल्या पेंग्विनची गोष्ट...

Nihilist Penguin Viral Video Become Internet Sensation : अंटार्क्टिकाची सकाळ. पांढऱ्या बर्फावर निळसर शांतता. हजारो पेंग्विन्स समुद्राकडे धावत होते. अन्नासाठी, जगण्यासाठी, पिल्लांसाठी. पण त्यांच्यातलाच एक पेंग्विन थांबला. तो वळला आणि समुद्राच्या उलट दिशेने चालू लागला. डोंगरांकडे. जिथे ना खोल समुद्र नाही बर्फ. होय, आम्ही त्याच पेंग्विनबद्दल बोलत आहोत जो 19 वर्षांनंतर इंटरनेटवर सर्वात मोठा सेन्सेशन बनला आहे.

अलीकडे धावपळीच्या जगात, कामाच्या ताणामुळे अनेकांना जिथे कोणीही नसेल, कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसेल, मोबाईल नेटवर्क नसेल असेल ती फक्त शांतता अशा लांब ठिकाणी जाण्याची इच्छा होते. असे विचार फक्त मनुष्याला नव्हेच तर, प्राण्यांच्याही मनात येत असतील. ही एकांतात जाण्याची चर्चा सुरू झाली ती म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पेंग्विनच्या व्हिडिओमुळे.

पेंग्विन सहसा कळपात राहतात आणि एकमेकांच्या मागे लागतात. पण, एक पेंग्विन त्याच्या कळपापासून वेगळा होतो आणि एकाकी वाटेवर चालू लागतो. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील घटनेशी अनेकांनी वेगवेगळे अर्थ लावले आहेत. तर, काहींनी या घटनेचा संबंध आजच्या वेगवान, तणावपूर्ण आणि वाढत्या आनंदहीन जीवनाशी जोडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @dixcreationvi

पेंग्विनचा हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. कारण, कळपाला सोडून अचानक आपला रस्ता बदलतो. तो ज्या ठिकाणी निघाला आहे तेथे ना समुद्र आहे ना बर्फ आहे ती फक्त शांतता. एकट्या निघालेल्या या पेंग्विनला कळपातील कुणी ना हाक मारतं ना कुणी थांब म्हणतं. कारण, थांबलं की प्रश्न विचारले जातात, अपेक्षा वाढतात. तुलना होते अन् मग आपण स्वतःपासून दूर जातो याच भावना पेंग्विनच्या मनात असतील असे काहींनी म्हटलं आहे.

शास्त्रज्ञांना काय वाटतं?

व्हायरल होणाऱ्या या पेंग्विनचा मूळचा व्हिडिओ हा 2007 मधील चित्रपट निर्माते वर्नर हझोर्ग यांच्या Encounters at the End Of the World या डॉक्टुमेंटरीतील असून, ही क्लिप ‘निहिलिस्ट पेंग्विन’ या नावाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पेंग्विनची चालण्याची पद्धत इतकी शांत आणि तात्विक आहे की, जणू काही त्याने जीवनाचा अर्थ पूर्णपणे सोडून दिल्याचे वाटू लागते. शास्त्रज्ञांच्या मते ही एक प्रकारची डेथ थेअर असून, काहींच्या मते ही एक न्यूरॉलॉजिकल कंडिशन आहे. कारण पेंग्विनना जमिनीखाली जगणे कठीण असते.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, अॅडेली पेंग्विन सामान्यतः त्यांच्या खाद्य आणि प्रजनन क्षेत्राजवळ राहतात. कधीकधी, पेंग्विन भटकू शकतो, परंतु अशा दुर्गम आणि ओसाड डोंगरांकडे प्रवास करणे असामान्य आहे. याची अनेक संभाव्य कारणे असू शकतात, ज्यामध्ये दिशाभूल होणे, आजार किंवा दुखापतीमुळे असे होऊ शकते. अनेकदा पर्यावरणीय परिस्थितीचा परिणामामुळेपण असे होऊ शकते.

follow us