राजयकीय विरोध पण दुश्मन नव्हे; एकेकाळी भुजबळांसाठी जायंट किलर ठरलेल्या नांदगावकरांकडून भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस

Bala Nandgaonkar यांनी ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. याबाबत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली

Bala Nandgaonkar

Bala Nandgaonkar, who was once a giant killer for Chhagan Bhujbal, inquires about Bhujbal’s health : मागील काही वर्षात महाराष्ट्रामधील राजकीय संस्कृती बिघडल्याचं बोललं जातं. त्याला कारण आहे ते एकमेकांवर केली जाणारी खालच्या भाषेतील टीका, त्याचबरोबर फोडाफोडीचे राजकारण. मात्र यामध्ये देखील महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही केवळ मतभेदाची आहे मनभेदाची नाही. याचेच उदाहरण ठरले आहे. मनसेचे बाळा नांदगावकर आणि यांनी घेतलेली छगन भुजबळ यांची भेट आणि केलेली त्यांच्या तब्येतीची विचारपूस. या भेटीबाबत स्वतः बाळ नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी या भेटीची माहिती दिली

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

मतभेद असावे, मनभेद नसावे.

राज्यातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. यावेळी त्यांच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिक म्हणून काम करत असताना भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते होते. दोघांमधील सारखा दुवा म्हणजेठाकरे परिवार“.

थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! तिरुवनंतपुरममध्ये कोण आहेत एनडीएच्या संभावित महापौर आर श्रीलेखा?

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांनी ही मनापासून आनंद व्यक्त केला. त्यांची आणि माझी राजकीय विचारधारा नंतरच्या काळात वेगळी असली तरी ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल मनात आदरच आहे. वयाच्या या टप्प्यात ही त्यांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांचा लढवय्या स्वभाव. अनेकदा प्रवाहाविरोधात जाऊन लढणारे भुजबळ साहेब वयाच्या या टप्प्यात ही लढवय्ये आहेत.

केरळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; तब्बल चार दशकांपासूनचा डाव्या विचारांचा बालेकिल्ला भेदण्यात भाजपला यश

मा बाळासाहेबएकूणच ठाकरे परिवारातील जुन्या आठवणी, आधीच्या काळातील केलेला संघर्ष त्यातून मिळविलेले यश, राजकारणाची बदलेली शैली याबद्दल ते मनापासून व्यक्त झाले. हॉस्पिटल मध्ये असले आणि शस्त्रक्रिया झाली तरी एकदम मनापासून ते व्यक्त होत होते. आम्ही दोघेही जुन्या गोष्टी आठवून भाऊक झालो.

https://www.facebook.com/100044193981272/posts/1452108739605578/?rdid=RTGGLovR14QhdESD#

Video : पवारांसोबतच्या बैठकीनंतर शिंदेंनी शाहंना खिशात टाकलं; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

आपल्या राज्याची संस्कृती आहे की आपल्या इथे राजकीय विरोधक असतात पण दुश्मन नव्हे. कारण राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे. ही संस्कृती हळूहळू लुप्त होत आहे असे सध्या जाणवते आहे. राजकारणातील धडधडती तोफ म्हणून ओळखले जाणारे भुजबळ साहेब हे लवकरात लवकर स्वस्थ होऊन परत सक्रीय व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

एकेकाळी भुजबळांसाठी जायंट किलर ठरलेले नांदगावकर

दरम्यान याच बाळा नांदगावकर यांनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांचा माजगाव विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता. त्यावेळी ते जायंट किलर म्हणून राज्यात प्रसिद्ध पावले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि नंतरच्या काळामध्ये राज ठाकरे यांची निष्ठावंत म्हणून नांदगावकर यांनी आपली ओळख कायम ठेवली. मात्र आता त्याच नांदगावकरांनी ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

follow us