थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! तिरुवनंतपुरममध्ये कोण आहेत एनडीएच्या संभावित महापौर आर श्रीलेखा?

BJP R Srilekha तिरुअनंतपुरम् महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा जिंकत एनडीए सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

BJP R Srilekha

BJP flag in Tharoor’s stronghold! Who is NDA’s likely mayor in Thiruvananthapuram, R Srilekha : एकीकडे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना दुसरीकडे केरळमध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली खालील एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तिरुअनंतपुरम् महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा जिंकत एनडीए सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा बालेकिल्ला मानला जातो.

केरळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; तब्बल चार दशकांपासूनचा डाव्या विचारांचा बालेकिल्ला भेदण्यात भाजपला यश

यामध्ये 101 पैकी तब्बल 50 जागा एनडीएने जिंकल्या आहेत. तर या ठिकाणी भाजपच्या संभावित महापौर पदाच्या उमेदवार एडीजीपी आर श्रीरेखा यांनी संस्थामंगलम वार्डमधून विजय मिळवला आहे. श्री लेखा नेमक्या कोण आहेत पाहुयात?

Video : पवारांसोबतच्या बैठकीनंतर शिंदेंनी शाहंना खिशात टाकलं; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

केरळच्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपकडून आर श्रीलेखा या तिरुअनंतपुरमच्या महापौर म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. श्रीलेखा यांनी सीपीएमच्या तरुण उमेदवार अमृता यांना पराभूत केला आहे.त्या केरळच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. मात्र दुसरीकडे महापौर पदासाठी महिला आरक्षण नसल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष वी वी राजेश कोंडानुरवाडमधून निवडून आलेले आहेत. त्यांना देखील महापौर पद दिले जाऊ शकते.

आ. आशुतोष काळे यांचा कॉर्नर सभेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद; प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा मांडला आराखडा

तसेच 2026 मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यातही आर श्रीलेखा यांनी विजय मिळवत एक वेगळा संदेश दिला आहे. त्यांची इमानदारी प्रोफेशनॅज्म आणि सुधारणावादी नेतृत्व हे पाहून त्यांना मतदान झाल्याचे बोलले जात आहे. तर गेल्या वर्षीच त्या भाजपामध्ये आल्या होत्या. अगोदर त्यांनी राज्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. त्यांच्या जबरदस्त अशा पोलीस पेशातील करिअरनंतर त्यांनी काही दिवस प्राध्यापक म्हणूनही काम केलेलं आहे. तसेच भारतीय रिझर्व बँकेमध्ये ही त्यांनी काम केलेलं आहे. 1986 मध्ये त्यांनी सिव्हिल सर्विसेस परीक्षा पास केल्यानंतर त्या केरळ कॅडेटमधून पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या होत्या.

follow us