Video : पवारांसोबतच्या बैठकीनंतर शिंदेंनी शाहंना खिशात टाकलं; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

Prakash Aambedkar यांनी भाजप शिवसेनेच्या युतीच्या घोषणेनंतर शिंदेंचं कौतुक तर अमित शाह आणि भाजपाला टोला लगावला आहे.

Prakash Aambedkar

Prakash Aambedkar Criticize BJP and Amit Shah on Allince with Eknath Shinde in Municiples : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगले तापले आहे. यामध्ये आता एक ट्विस्ट आला आहे. कारण स्वबळावर वाढण्याचा नारा देणाऱ्या भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बहुतांश ठिकाणी युती होण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कौतुक तर अमित शाह आणि भाजपाला टोला लगावला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पॉवर काय आहे हे दाखवून दिली आहे. येणाऱ्या राज्यातल्या महापालिका आम्ही वेगळे लढणार अस भाजपा सांगत होतं. आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. कारण युती करून लढू अस सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे अमित शाह यांना भेटले. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात घातलं आहे ही त्यांची किमया आहे. सर्व पालिकेत शिंदे आणि भाजप युती मध्ये लढणार आहेत.

नेमके कोण आहेत मेस्सीच्या ‘GOAT इंडिया टूर 2025’ चे आयोजक सताद्रु दत्ता; चाहत्यांच्या गोंधळानंतर अटक

विधानसभा झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही. त्याचा बदला असावा त्यावरून दिसत आहे की, एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतात का? असं वाटत आहे. तसेच काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला. मला हे आणि असच दिसत आहे. अमित शहा सारख्याला ते खिशात घालतात.

https://www.youtube.com/live/YSua0cLEM1A?si=ueSD1xEE5tyTK3j1

follow us