आ. आशुतोष काळे यांचा कॉर्नर सभेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद; प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा मांडला आराखडा
कॉर्नर सभेत आमदार आशुतोष काळे यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा मांडत नागरीकांशी संवाद साधला.
MLA Ashutosh Kale interacts with citizens : कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या विकासाचे कोणतेच मुलभूत प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. कोपरगाव शहराला(Kopargaon City) समृद्ध आणि विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास(Developement) करायचा आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपरीषदेची सत्ता द्या, विकासाच्या राहिलेल्या समस्या संपुष्टात आणल्याशिवाय राहणार असा विश्वास आमदार आशुतोष काळे(MLA Ashutosh Kale) यांनी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 6 व 7 मध्ये आयोजित कॉर्नर सभेत उपस्थित नागरीकांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश (काका) कोयटे तसेच प्रभाग क्रमांक 6 व 7 मधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित कॉर्नर सभेत आमदार आशुतोष काळे यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा मांडत नागरीकांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
पवारांसोबतच्या बैठकीनंतर शिंदेंनी शाहंना खिशात टाकलं; शिंदे-शाह भेट अन् युतीवरून आंबेडकरांचा टोला
आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. अनेक मुख्य रस्त्यांची कामे झाली आहेत, त्याचबरोबर स्वच्छता, भूमिगत गटारी, शहर सुशोभिकरण अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित शिल्लक असलेल्या सर्व मुलभूत प्रश्नांवर येत्या तीन वर्षांत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके पूर्ण होत असतांना त्यापैकी तब्बल चाळीस वर्षे विरोधकांच्या हातात सत्ता होती. या चाळीस वर्षात कोपरगावचा विकास वेगाने व्हायला हवा होता, मात्र विरोधकांनी जाणीव पूर्वक कोपरगावच्या विकासाची गंगा अडवण्याचे काम केले. नागरिकांच्या समस्या सुटल्या तर राजकारण कशावर करणार, या मानसिकतेतून कोपरगावकरांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आले.
चाळीस वर्षे सत्ता हातात असतांना विकासाचा एकही प्रश्न शिल्लक राहायला नको होता, मात्र विकास हे कधीच त्यांचे उद्दिष्ट नव्हते, त्यामुळेच कोपरगाव विकासाच्या बाबतीत मागे पडले होते. ज्याप्रमाणे पवित्र गोदावरी नदी कोपरगावमधून वाहते, त्याचप्रमाणे कोपरगावमधून विकासाची गंगा वाहू लागेल. त्यासाठी कोपरगाव शहरातील सुजाण मतदारांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
मेस्सीला भारतात आणणाऱ्या आयोजकला अटक; जाणून घ्या, कोण आहे सताद्रु दत्ता?
प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचार फेरी सुरु असतांना अनेक माता भगिनींनी काकासाहेब कोयटे यांचे औक्षण करतांना ‘इडापिडा जाऊ दे, आणि बळीचे राज्य येऊ दे’ असे भावनाप्रधान विधान केले. त्यावेळी काका कोयटे यांनी त्या भगिनींना मी निवडून येणार आणि कोपरगावची इडापिडा जाऊन विकासाचेच राज्य येणार आहे. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवून पुन्हा विकासाच्या वाटेवर आणले आहे. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराला विकसित शहराच्या यादीत कोपरगाव शहराला नेवून बसवायचे आहे. कोपरगाव शहराचा विकास हा एकच ध्यास घेऊन कोपरगावकरांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असल्याचे काका कोयटे यांनी यावेळी सांगितले.
