राज्यातील ‘या’ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरु, 21 डिसेंबरला होणार मतमोजणी

Maharashtra Local Body Election : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 पासून सुरु झाली

  • Written By: Published:
Maharashtra Local Body Election

Maharashtra Local Body Election : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 पासून सुरु झाली असून संध्याकाळी 5.30 पर्यंत चालणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी या 23 नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती मात्र या नगरपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्केपेक्षा जास्त झाल्याने 2 डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया रद्द करत राज्य निवडणूक आयोगाने नवीन निवडणूक प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली होती. यानुसार आज राज्यातील 23 नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी मतदान होत आहे.

तर दुसरीकडे 21 डिसेंबर रोजी 2 डिसेंबर आणि आज होणाऱ्या मतदानाचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज होणाऱ्या 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या (Maharashtra Local Body Election) मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली आहे. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली होती मात्र काही ठिकाणा आरक्षणावरुन उमेदवारांना न्यायालयात अपील केल्याने राज्य निवडणूक आयोगाने 23  नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी पार पडणार आणि 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

आज या 23 पालिका,पंचायतींसाठी मतदान

अंबरनाथ

कोपरगाव

देवळाली -प्रवरा

पाथर्डी

नेवासा

बारामती

फुरसुंगी-उरुळी देवाची

यवतमाळ

वाशिम

देऊळगावराजा

देवळी

घुग्घूस

फलटण

फुलंब्री

मुखेड

धर्माबाद

निलंगा

रेणापूर

वसमत

अंजनगाव

सूर्जी

बाळापूर

अनगर

मंगळवेढा

अनावश्यक खर्च टाळा,प्रवासातही होणार त्रास, जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी 20 डिसेंबर कसा राहील?

महाबळेश्वर

follow us