मोठी बातमी! प्रफुल पटेल यांनी घेतली पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांची भेट, दिल्लीत काय शिजतय?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. असं असतानाच आज प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 03T192131.644

राज्यात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली आहे. प्रफुल पटेल यांनी मोदी आणि शाहांची भेट घेऊन त्यांच्याशी पाच ते सहा मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं याचा तपशील मात्र समोर आलेला नाही.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्त एनडीएच्या सर्व खासदारांची एक बैठक घेतली आणि त्यांना संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी अजित पवारांनाही श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रफुल पटेल हे मोदी आणि अमित शाहांना भेटले.

Video : अजित पवारांच्या बायोपिकमध्ये अभिनेता कोण? स्वतः अजितदादांनी दिलं होतं उत्तर

प्रफुल पटेल यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आणि अमित शाहांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला होता अशी माहिती समोर आली होती. प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे बडे नेते असून केंद्रीय स्तरावरील पक्षाचे निर्णय ते घेतात. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची त्यांनी घेतलेली भेट ही महत्त्वाची समजली जाते.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा नाही

अजित पवारांच्या पश्चात दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही? तसंच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबतही जोरदार चर्चा रंगत आहेत. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल पटेलांकडेच हे पद जाणार अशी चर्चा सुरू होती. आता त्यावर प्रफुल पटेलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल असं प्रफुल पटेलांनी पुढे येत स्पष्ट केलं. त्यामुळे सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे अप्रत्यक्ष संकेत प्रफुल पटेलांनी दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असं सांगत प्रफुल पटेल यांनी या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसंच अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली यावर अनेक जणांनी आक्षेप घेतला. मात्र सुनेत्रा पवारांनी किती दिवस दुःख मानावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचं म्हणत पटेलांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

follow us