तयारीला लागा, SBI मध्ये 13,735 जागांसाठी मेगा भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील
SBI Recruitment 2024 : तुम्ही जर सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयमध्ये (SBI) मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेत तुम्ही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक पदासाठी 13,735 पदांची भरती जाहीर केली आहे. लिपिक पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. तुम्हाला देखील या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन sbi.co.in अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 जानेवारी 2025 आहे. तसेच या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जाणून घ्या संपूर्ण तपशील
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कुठल्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवार अधिक माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन भेट देऊ शकतात.
अर्जासाठी शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 750 रुपये भरावे लागणार आहे. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/एक्सएस/डीएक्सएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्कात सूट देण्यात आली आहे. उमेदवार परीक्षा शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगचा वापर करून भरू शकतो.
SBI Clerk Recrutiment 2024
Vacancies: 13735 Posts
Click on the link for details:https://t.co/OhffZ2UB9WLast Date: January 7, 2025#jobs #job #sbiclerk pic.twitter.com/Z1wkO1OXwy
— Govt Jobs Portal – Latest Govt Jobs in India (@Jobsportalforu) December 17, 2024
अर्ज भरण्यासाठी तारीख
अर्ज भरण्यासाठी सुरुवात : 17 दिसंबर 2024
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 7 जनवरी 2025
प्रिलियम परीक्षा : अंदाजे फरवरी 2025
भाजप ॲक्शन मोडमध्ये, तब्बल 20 खासदारांना पाठवणार कारणे दाखवा नोटीस, नेमकं प्रकरण काय?
मुख्य परीक्षा : अंदाजे मार्च/अप्रैल 2025
नागपूर मेट्रो प्रकल्पाला मिळणार चालना; आशियाई विकास बँक करणार 1527 कोटींचे अर्थसहाय्य