तरूणांसाठी सुवर्णसंधी! SBI क्लर्क पदांसाठी 26 ऑगस्टपर्यंत अर्ज करा, 5180 पदांसाठी मेगाभरती सुरू

तरूणांसाठी सुवर्णसंधी! SBI क्लर्क पदांसाठी 26 ऑगस्टपर्यंत अर्ज करा, 5180 पदांसाठी मेगाभरती सुरू

SBI Clerk Vacancy 2025: देशातील सर्वात मोठी बँक SBI लवकरच क्लर्क पदांसाठी मेगाभरती सुरू आहे. परंतु येत्या 26 तारखेला ही भरती (SBI Clerk) बंद होणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 5180 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली (SBI Clerk Recruitment) जाईल. अर्ज प्रक्रिया 6 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट (Job Update) द्यावी लागेल. अधिसूचनेनुसार, SBI Clerk Tier-1 परीक्षा सप्टेंबर 2025 मध्ये आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2025 मध्ये घेतली जाईल.

शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. परंतु पदवी 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी मिळाली आहे याची खात्री करा. अधिसूचनेनुसार, उमेदवार फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे (वाचणे, लिहिणे, बोलणे आणि समजणे) चांगले ज्ञान असल्याची खात्री करा.

चलती का नाम गाडी, रूक गये तो खटारा! मोदी सरकारच्या कारभारावर अण्णा हजारे काय बोलून गेले? पाहा VIDEO

वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2025 च्या आधारावर मोजले जाईल. उमेदवारांची जन्मतारीख 2 एप्रिल 1997 पूर्वीची आणि 1 एप्रिल 2025 नंतरची नसावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

https://sbi.co.in/documents/77530/52947104/JA+2025+-Detailed+Advt.pdf/8f7ff18f-1972-21c8-9212-5a8cf85a7099?t=1754398573326

अर्ज शुल्क :
सामान्य, ईडब्ल्यूएस, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

मोठी बातमी! भटक्या कुत्र्यांना नसबंदी करून सोडून द्यावे; सर्वोच्च न्यायालयाचा सर्व राज्यांना आदेश

निवड प्रक्रिया :
सर्वप्रथम, ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा असेल. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागेल. स्थानिक भाषा चाचणी अर्ज भरताना निवडलेल्या स्थानिक भाषेची असेल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube