Share Market : नाम बडे और रिटर्न छोटे; टॉप कंपन्यांचे शेअर्स घेऊन गुंतणुकदार फसले, वाचा आकडे

  • Written By: Published:
Share Market : नाम बडे और रिटर्न छोटे; टॉप कंपन्यांचे शेअर्स घेऊन गुंतणुकदार फसले, वाचा आकडे

Large Cap Blue Chip Companies Performance In Share Market Last Year : अनेक तज्ज्ञांकडून ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली जाते. अशी गुंतवणूक करण्यामागचा मूळ उद्देश कमी जोखीम हा आहे. खरं तर, ब्लू चिप कंपनी ही एक प्रतिष्ठित कंपनी असते, ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत असते आणि दीर्घकाळ चांगल्या व्यवसायाचा ट्रॅक रेकॉर्ड असतो. या कंपन्या मार्केट कॅपच्या बाबतीत मोठ्या असतात अशा कंपन्यांना लार्ज कॅप कंपन्यादेखील संबोधले जाते. मात्र, गेल्या वर्षभरात देशातील टॉप कंपन्यांनी शेअरमार्केटमधील (Share Market) गुंतवणुकदारांची घोर निराशा केली आहे. याचाच घेतलेला हा आढावा…

सर्किटची शेअर मार्केटमधून सुट्टी, भला मोठा दंड ठोकत SEBI ची अभिनेता अर्शद वारसीवर कारवाई

वर्षभरात टॉप कंपन्यांनी केली निराशा

गेल्या वर्षभरात देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना निराश केल्याचे चित्र आहे. खराब आर्थिक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसला आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये (BSE) सूचीबद्ध असलेल्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांनी गेल्या एका वर्षात (8 ऑगस्ट 2024 ते 7 ऑगस्ट 2025) निराशाजनक परतावा दिला आहे. यामुळे करोडो गुंतवणुकादारांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. गेल्या वर्षभरात टॉप कंपन्यांपैकी काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

कोणत्या कंपन्यांनी किती रिटर्न दिले?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय तेल आणि वायू, किरकोळ विक्री, दूरसंचार, डिजिटल सेवांमध्ये पसरलेला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 18.82 लाख कोटी रुपये आहे. परंतु गेल्या एका वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना परतीच्या आघाडीवर निराश केले आहे. एका वर्षात, आरआयएलच्या शेअरने सुमारे 5 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. प्रत्यक्षात, जागतिक तेलाच्या किमतीतील अस्थिरता आणि रिफायनिंग मार्जिनमध्ये घट झाल्यामुळे शेअरमार्केटवर दबाव आहे. मात्र, जिओच्या 5 जी रोलआउट आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील सुधारणांमुळे तोटा काही प्रमाणात कमी झाला आहे.

पंप अँड डंप : शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी कमावून देणारा घोटाळा; कशी होते सामान्यांची फसवणूक?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. 7 ऑगस्ट 2025 रोजी कंपनीचे मार्केट कॅप 11.02 लाख कोटी रुपये होते. मात्र, गेल्या वर्षात या शेअरने सुमारे 27 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. सध्या शेअरची किंमत 3,049.10 रुपये आहे. जागतिक आर्थिक दबावामुळे कंपनीची कामगिरी थोडी मंदावली आहे. त्यामुळे हा शेअर एका श्रेणीत व्यवहार करत आहे. मात्र, यानंतही अनेक गुंतवणुकदार याच स्टॉकमध्ये विश्वासावर पैसे गुंतवत असल्याचे चित्र आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ही मार्केट कॅपबाबत देशातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी फर्म आहे. SBI चे मार्केट कॅप 7 ऑगस्ट रोजी सुमारे 7.43 लाख कोटी रुपये आहे. परंतु गेल्या वर्षी या बँकेच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना निराश केले आहे. म्हणजेच, नकारात्मक परतावा दिला. सध्या हा स्टॉक 800 रुपयांच्या आसपास आहे. वर्षापूर्वीदेखील हा स्टॉक या रकमेच्या आसपास होता. बाजारातील आकडेवारीनुसार SBI च्या स्टॉकने एका वर्षात सुमारे 2 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

इन्फोसिस लिमिटेड

आयटी फर्म इन्फोसिस लिमिटेड देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर असून. ही देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी देखील आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 5,97,239 कोटी रुपये आहे. मात्र, गेल्या वर्षभरात आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. इन्फोसिसच्या शेअरने एका वर्षात सुमारे 18% नकारात्मक परतावा दिला असून, सध्या इन्फोसिसच्या शेअरची किंमत सुमारे 1423 रुपये आहे. एका वर्षापूर्वी शेअरची किंमत सुमारे 1743 रुपये होती.

Ahilyanagar : 450 कोटींचा मेगा गंडा! 21 हजार गुंतवणूकदार लुबाडले, ‘ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट’ घोटाळ्याने खळबळ

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL)

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ही देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी आहे. गेल्या काही वर्षांपासून हा शेअर गुंतवणूकदारांच्या यादीतील फेव्हरेट राहिला आहे. परंतु एका वर्षात परताव्याच्या बाबतीत HUL ने खराब कामगिरी केली आहे. HUL च्या शेअरने एका वर्षात 8 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. अगदी एक वर्षापूर्वी म्हणजे 7 ऑगस्ट 2024 रोजी, HUL च्या शेअरची किंमत 2733 रुपये होती, जी आता 2511 रुपयांवर घसरली आहे. मार्केट कॅपबाबत HUL देशातील आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असून, याचे मार्केट कॅप 5,91,509 कोटी रुपये आहे.

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)

भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC ही भारतातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी आहे. एवढेच नव्हे तर, देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी देखील आहे. बाजार भांडवलानुसार, LIC ही देशातील 9 वी सर्वात मोठी कंपनी असून, याचे बाजार भांडवल 5,60,046 कोटी रुपये आहे. सध्या, LIC च्या शेअरची किंमत 918 रुपये आहे, एका वर्षापूर्वी शेअरची किंमत 1125 रुपये होती, म्हणजेच गेल्या एका वर्षात LIC च्या शेअर्सनी 18 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube