सोन्याच्या किमतींचा नवा उच्चांक! प्रति तोळा 1.10 लाखांचा टप्पा गाठला, पुढे काय?
सोन्याच्या भावाने 9 सप्टेंबर रोजी इतिहासातील उच्चांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारातील अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीच्या शक्यता वाढली.

Gold Prices Record High Futures : सोन्याच्या भावाने 9 सप्टेंबर रोजी इतिहासातील उच्चांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारातील अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीच्या शक्यता वाढली. त्यामुळे गुंतवणूकदार‘सेफ हेवन’ म्हणजेच सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे मोठ्या प्रमाणात वळले.
भारतातील बाजारपेठेतील दर :
एमसीएक्स (Multi Commodity Exchange) वर ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव (Gold Prices) ₹1,09,500 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल 2026 चे करार देखील उच्चांकी पातळीवर (Investment) पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर:
COMEX वर सोन्याचा भाव $3,694.९ प्रति औंस या नव्या विक्रमी दरावर पोहोचला आहे.
भाववाढीची मुख्य कारणे:
– अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या कठोर आयातशुल्कांमुळे जागतिक व्यापारात अनिश्चितता वाढली.
– अमेरिकेची नोकरीसंबंधी आकडेवारी कमकुवत आली. ऑगस्ट महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी रोजगारनिर्मिती झाल्याने फेडरल रिझर्व्हकडून 50 बेसिस पॉईंट्सने व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढली.
– अमेरिकन डॉलर कमकुवत झाला.
– रशिया-युक्रेन युद्ध आणि ऊर्जा प्रकल्पांवर झालेले हल्ले यामुळे भूराजकीय तणाव वाढला.
गुंतवणूकदारांचा कल
जागतिक सोन्याच्या ETF मध्ये ऑगस्ट महिन्यात तब्बल $5.5 अब्जची गुंतवणूक झाली. केंद्रीय बँका त्यांच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवत आहेत. सोन्याच्या नाण्यांची आणि बिस्किटांची खरेदी वाढली आहे. मात्र, दर जास्त असल्याने दागिन्यांची खरेदी काही प्रमाणात कमी झाली आहे.
सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात
भारतीय ग्राहक उच्च भावामुळे जुन्या दागिन्यांची विक्री करत आहेत. सरकारने कमी शुद्धतेच्या सोन्यालाही हॉलमार्किंगमध्ये समाविष्ट केल्याने बाजारात पर्याय वाढले आहेत. आगामी सणासुदीचा काळ सोन्याच्या मागणीसाठी निर्णायक ठरेल. तज्ञांच्या मते, सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात $3,400 ते $3,600 प्रति औंस या पातळीत राहू शकतो. भारतात एमसीएक्सवर सोनं सध्या ₹1,10,000 च्या आसपास असून, ही मजबूत आधाररेषा (support level) मानली जात आहे.