महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस अन् 35 लाख नोकऱ्यांची संधी; दावोसमध्ये फडणवीसांची मोठी घोषणा
Investment in Maharashtra दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याला 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या दिशेने करार केले गेले आहेत.
Investment in Maharashtra and 35 lakh job opportunities; Fadnavis’ big announcement in Davos : राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला रवाना झाले आहेत. दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पार पडत त्यामध्ये राज्याला 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या दिशेने करार केले गेले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये अनेक कंपन्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
दावोसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की,महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडेल 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये म्हटलं आहे. राज्यामध्ये सध्या तिसरी मुंबई उभी राहत असून या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे संकेत देखील फडणवीसांनी दिले आहेत.
Sameer Gaikwad Death : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू; कारण काय?
यामध्ये सुमारे दहा ते बारा वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगांशी सध्या समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ एज्युसिटी इनोव्हेशन सिटी स्पोर्ट्स सिटी आणि मेडी सिटी यासारखे प्रकल्प उभारले जात आहेत. ज्यातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल तसेच यामध्ये 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील. असंही त्यांनी सांगितलं .
