ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वाचा निर्णय! मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केल्या चार नव्या योजना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या योजनांची माहिती देत शेतकरी, पशुपालक आणि मस्त्यव्यवसायिकांसाठी मोठा दिलासा देणारे निर्णय जाहीर केले.

  • Written By: Published:
Untitled Design 140

Chief Minister Fadnavis announced four new schemes : यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने ग्रामीण आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी काही महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या नव्या योजनांची माहिती देत शेतकरी, पशुपालक आणि मस्त्यव्यवसायिकांसाठी मोठा दिलासा देणारे निर्णय जाहीर केले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महत्वाच्या योजनांची घोषणा केली. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे हा या योजनांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वप्रथम मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण आणि शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांसाठी आर्थिक मदत प्रशिक्षण आणि आवशयक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल आणि शेतकऱ्यांना शेतीसोबतच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत देखील उपलब्ध होईल.

याशिवाय महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान देखीक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि आवशयक तांत्रिक मदत दिली जाणार आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता वाढेल, उत्पन्नाचा खर्च कमी होईल आणि पर्यावरणपूर्वक शेतीला चालना मिळेल, असा सरकारला विश्वास आहे.

दरम्यान, किनारपट्टी आणि जलसंपत्ती असलेल्या भागातील मत्स्यव्यवसायिकांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेद्वारे मत्स्यव्यवसायासाठी आधुनिक साधनसामग्री, पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. मत्स्य उत्पादन वाढवणे, मत्स्य व्यवसायातील प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि मत्स्यव्यवसायिकांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांना शेतीपर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना देखील जाहीर करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये शेतांपर्यंत जाणारे रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिके वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या योजनेअंतर्गत शेतपाणंद रस्त्यांचे जाळे उभारण्यात येणार असून त्यामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. एकूणच, या चार योजनांद्वारे राज्यातील शेती, पशुपालन आणि मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags

follow us