मुंबईतील व्यक्तीकडून आंदोलकांसाठी जेवण, झोमॅटो रायडरने भर पावसात पोहोचवलं; दिल्लीतील आंदोलनात माणुसकीचे दर्शन
Delhi CJP Protest तील आंदोलनादरम्यान एक हृदयस्पर्शी घटना घडली असून, तिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
Delhi CJP Protest Zomato rider delivered meal provided by an individual from Mumbai to protesters amidst heavy rain : नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान एक हृदयस्पर्शी घटना घडली असून, तिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी आणि तरुण दिल्लीत आंदोलन करत आहेत.
वर्षांनुवर्षे एकच ‘डीपी’ ठेवणाऱ्या लोकांचा स्वभाव नक्की कसा असतो? मानसशास्त्र काय सांगते?
अशातच महाराष्ट्रातून एका व्यक्तीने आंदोलकांसाठी ऑनलाइन जेवण पाठवून माणुसकीचा अनोखा संदेश दिला. 20 जुलै रोजी आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, ज्यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीची आंदोलनात उडी; महाराष्ट्र बंदची हाक, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
या घटनांनंतर संध्याकाळी जंतर-मंतर परिसरात एक झोमॅटो डिलिव्हरी कर्मचारी जेवण घेऊन पोहोचला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये डिलिव्हरी कर्मचारी सांगताना दिसतो की, “महाराष्ट्रातील अमित रावत यांनी हे जेवण ऑनलाइन ऑर्डर केले असून, जंतर-मंतरवर जो कोणी उपाशी असेल त्याला हे अन्न द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचे पूर्ण ऑनलाइन पेमेंटही करण्यात आले आहे.”
त्याने पुढे उपस्थितांना सांगितले की, “ज्याला गरज असेल त्याने हे जेवण घ्यावे. इच्छुकांनी ते इतर गरजू आंदोलकांनाही वाटू शकता.” डिलिव्हरी कर्मचाऱ्याने ग्राहकाच्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करत आंदोलकांपर्यंत अन्न पोहोचवले. त्यानंतर उपस्थितांनी त्याचे कौतुक करत टाळ्यांच्या गजरात त्याचे आभार मानले. तसेच जेवण पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील अमित रावत यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
‘आवारापन 2’मधील ‘ये आवारापन’ गाणे प्रदर्शित; अरिजित सिंगची विशेष फिल्म्ससोबत पुन्हा जुळली सुरेल मैफल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेकांनी या कृतीला माणुसकीचे सुंदर उदाहरण म्हटले आहे. “स्वतःपेक्षा इतरांच्या भुकेचा विचार करणारी ही भावना प्रेरणादायी आहे,” अशा प्रतिक्रिया अनेक नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, या घटनेबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरही शेअर करण्यात आली. पोस्टमध्ये महाराष्ट्रातून आंदोलकांसाठी अन्नाची व्यवस्था करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला असून, या कृतीचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे.