पाकिस्तानमध्ये लष्कराविरोधात पश्तूनोंचे बंड ! सुरक्षा दलाच्या गोळीबारात सात आंदोलकांचा मृत्यू

  • Written By: Published:
पाकिस्तानमध्ये लष्कराविरोधात पश्तूनोंचे बंड ! सुरक्षा दलाच्या गोळीबारात सात आंदोलकांचा मृत्यू

Thousands protest against military operation in Pakistan: पाकिस्तान (Pak) लष्कराविरोधात पश्तूनो जमातीने बंड केले आहे. त्याविरोधात लष्कराने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केलाय. त्यात सातहून अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी हजारो पश्तुनो यांनी अफगाण सीमेवर पाकिस्तानच्या लष्कराविरोधात आंदोलन केले आहे. तर आंदोलनकर्त्यांनी लष्करी कारवाईला विरोध दर्शविला आहे. (Pashtun rebellion against the army in Pakistan! Seven protesters were killed in firing by security forces)

विधानसभेत महाविकास आघाडीचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

अफगाणिस्तानच्या सीमापासून 40 दूर असलेल्या बन्नू येथे पश्तुनो जमातीच्या दहा हजार लोकांनी रॅली काढली होती. पांढरे झेंड दाखवून ते शांतता स्थापन करण्यासाठी एकत्र आले होते. चार दिवसांपूर्वी या भागात लष्कर आणि पश्तूनो नागरिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. एक वाहनाचा स्फोट होऊन सात सैनिक ठार झाले होते. गेल्या सोमवारी ही घटना घडली होती. त्यानंतर पाकचे लष्करही नागरिकांविरोधात आक्रमक होत या भागात घुसले होते.

पिचड, लहामटे चितपट होणार? शरद पवारांनी ‘अमित भांगरेंना’ दिली ताकद

या भागात गेल्या वीस वर्षांपासून पाककडून सैन्य अभियान राबविण्यात येत आहे. त्यानंतरही या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. तर याच वर्षी पाकिस्तान सरकारने एक घोषणा केली होती. अफगाणिस्तानच्या सीमेवरील हिंसा रोखण्यासाठी एक अभियान राबविले जाईल, अशी घोषणा केली होती. तर तालिबान सरकार सत्तेत आल्यानंतर या भागात हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.

हिंसा कशी भडकली !

आंदोलक हे लष्कराच्या तळ असलेल्या भिंतीपर्यंत गेले होते. ते लष्कराविरोधात घोषणा देत होते. आंदोलनकर्त्यांनी लष्करी तळावर दगडफेक सुरू केली होती. त्यानंतर सैनिकांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यातही अनेक जणांचे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या भागात पाकिस्तानमधील तालिबान नावाची कुख्यात तहरीक ए तालिबान ही संघटना या भागात कार्यरत आहे. या संघटनेने हजारो नागरिकांची हत्या केलेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube