आमदार संग्राम जगतापांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’; फडणवीसांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण
MLA Sangram Jagtap यांना प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
MLA Sangram Jagtap to be awarded ‘Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Award’; Fadnavis to distribute award : गेल्या कित्येक दिवसांपासून अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता त्यांच्या या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी त्यांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
अमेरिका इराण युद्ध पेटलेलं, मराठवाड्यातील अनेक नागरिक आखाती देशात अडकले
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर हा पुरस्कार दिला जातो. हिंदू कार्यासाठी व रक्षणासाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार जगताप यांनी प्रखर हिंदुत्वची भूमिका घेतली असून अहिल्यानगरसह राज्यातही ते या भूमिकातून काम करीत आहेत. त्याची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनी 18 मार्चला वढू (ता. शिरूर ) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
दरम्यान आमदार संग्राम जगताप हे गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत. यामध्ये त्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यापासून लव्ह जिहाद, हिंदुंच्या सणामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांकडून खरेदी न करणे, मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांच्या बंदीचं समर्थन मुस्लिम उमेदवार न देणे अशा एक ना अनेक आक्रमक विषयांवर आपली भूमिका मांडली आहे.
