सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्ज माफीची घोषणा…

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आज शेतकरी कर्ज माफीची घोषणा करत अनेक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठित केली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी योजना मी जाहीर करत आहे.

30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्यांना लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज विधानसभेत 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे.  यावेळी त्यांनी मोठी घोषणा करत शेतमजुरांचा समावेश गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वाचा निर्णय! मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केल्या चार नव्या योजना

तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना आणि महाराष्ट्र शेती अभिनय नव्या योजनेची घोषणा केली आहे. तसेच कृषी समृद्ध योजनेअंतर्गत चार वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

लाडकी बहिण योजनेसंदर्भात अर्थसंकल्पातून मोठी घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे. एकल महिलांच्या कल्याणसाठी लवकरच धोरण आणण्यात येईल. 25 लाख दीदींना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे.

follow us