Iran-Israel War:पडत्या बाजारातही सोलर, पवण ऊर्जा कंपन्यांच्या शेअर्सने भरला ‘दम’

Iran-Israel War: या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स गुरुवारी 3 ते 14 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. या कंपन्यांना भविष्यात महत्त्व येणार आहे.

  • Written By: Published:
Green Energy Share

India LPG Cylinder Shortage : इस्रायल व इराण युद्धामुळे भारतीय शेअर बाजार कोसळत आहे. क्रूड ऑइलचे ( crude oil) (कच्चे तेल) भाव वाढत आहे. तर गॅसचा पुरवठाही (LPG Cylinder Shortage) खंडित झाला आहे. भू राजकीय संकटामुळे शेअर बाजारात गुरुवारीही पडझड झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या वगळता इतर सेक्टरचे शेअर्स कोसळले आहेत. या जागतिक अनिश्चितेमध्ये सोलर (सौर), पवण ऊर्जा कंपन्यांचे शेअर्स वाढत आहे. या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स गुरुवारी 3 ते 14 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. या कंपन्यांना भविष्यात महत्त्व येणार असल्याने गुंतवणूकदार या क्षेत्रातील कंपन्यांकडे आकर्षित होऊ लागले आहे.


भारतीय टँकरांना होर्मुज मार्ग खुला केल्याचा दावा खोटा; इराणचा खुलासा, इस्रायलविरोधी अट घातल्याची माहिती

गुरुवारी सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशाकांमध्ये घसरण झालीय. सेन्सेक्समध्ये 829 अंकांनी घसरण झाली असून, सेन्सेक्स 76,034 अंकावर आला आहे. तर निफ्टीमध्येही 227 अंकांनी घसरण येऊन निफ्टी 23,639 अंकांवर आली आहे. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे बाजारात घसरण होत आहे. परंतु renewable energy कंपन्यांचे शेअर्सकडे गुंतवणूकदार आकर्षित होऊ लागले आहेत. गुरुवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये 13.8 टक्के वाढ झाली आहे. (NTPC Green Energy) तर सोलाक्स एनर्जी (Solex Energy)चे शेअर्समध्ये 13 टक्के वाढ झाली आहे. तर केपीआय (KPI Green Energy) च्या शेअर्समध्ये 11.8 टक्के, तर सात्विक ग्रीन एनर्जी (Saatvik Green Energy) च्या शेअर्समध्ये 7.9 टक्के वाढ झाली आहे.

Servotech Renewable Power च्या शेअरमध्ये 4.8 टक्के वाढ झाली आहे. तर ACME Solar Holdings च्या शेअर्समध्ये चार टक्के, तर Inox Wind advanced च्या शेअरमध्ये टक्के वाढ झाली आहे. सुझलॉन एनर्जी, विक्रम सोलार या कंपन्यांच्या शेअरमध्ये दोन टक्के वाढ झाली आहे.

जागतिक स्तरावर क्रूड ऑइलचा दर वाढत आहे. ब्रेंट क्रूडचा भाव शंभर रुपयापर्यंत गेला आहे. हॉर्माज सामुद्रधुनीतून (Hormuz) जहाजांची वाहतूक थांबविली आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्याला पर्याय म्हणून भविष्यात सोलर एनर्जीला प्रचंड महत्त्व येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकादारांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरू केले आहे.


निफ्टी एनर्जी इंडेक्समध्ये दोन टक्क्यांनी वाढ

एनर्जी इंडेक्समध्ये वाढ होत आहे. निफ्टी एनर्जी इंडेक्स दोन टक्क्यांनी वाढला आहे. निफ्टी ऑइल आणि गॅस इंडेक्समध्ये अर्धाटक्का वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील शेअर्स पडले आहेत.

टीप-ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. गुंतवणुकीचा सल्ला नाही.

follow us