Ahilyanagar : 450 कोटींचा मेगा गंडा! 21 हजार गुंतवणूकदार लुबाडले, ‘ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट’ घोटाळ्याने खळबळ

Cheated 450 Crores Investing Stock Market : दरमहा 10 ते 15 टक्के परतावा… गुंतवणूक अल्पावधीत होणार दुप्पट! अशा गोड गोड शब्दांनी समोरच्याचा विश्वास संपादन करायचा मोठ मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये दिमाखदार (Ahilyanagar News) सेमिनार घ्यायची. आपल्यावर विश्वास बसेपर्यंत सुरुवातीला काही दिवस परतावा द्यायचा. असं करत करत एके दिवशी थेट गायबच व्हायचं. मात्र, याच विश्वासाला साथ देत शंभर दोनशे नव्हे, तर तब्बल 21 हजार 361 गुंतवणूकदारांना 450 कोटी रुपयांच्या गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर (Fraud) आला आहे. शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करून दरमहा 10-15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट प्रा. लि.’ या कंपनीने तब्बल 450 कोटी रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ‘सिस्पे फिनोवेल्थ इंडिया’ आणि ‘इन्फिनिटी इन्व्हेस्टमेंट’ या कंपन्यांच्या ‘ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.’ या मूळ कंपनीच्या नवनाथ अवताडे याच्यासह (Stock Market) आठ जणांविरूध्द सुपा पोलिसांत गुन्हा नोंदवला.
या प्रकरणी विनोद बबन गाडीलकर (वय 44 रा. वाघुंडे, माळवाडी, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, नवनाथ अवताडे व त्याच्या साथीदारांनी सुरू केलेल्या इन्फिनेट, सिस्पे या कंपन्यातील फसवणूक प्रकरणी श्रीगोंदा व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आता ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट प्रा. लि.’ या कंपनीत फिर्यादी व इतर 21 हजार 361 गुंतवणूकदारांनी सुमारे 450 कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा व नवनाथ जगन्नाथ अवताडे (सर्व रा. पुणे) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
भामट्यांनी कोट्यवधींच्या गंडा कसा घातला?
या गुन्ह्याची पद्धत सखोल आणि योजनाबद्ध होती. त्याची सुरुवात एका कार्यक्रमातील ओळखीने झाली. फिर्यादी विनोद बबन गाडीलकर (वय 44, माळवाडी, वाघुंडे, पारनेर) यांना नवनाथ औताडे याने आर्थिक परताव्याचे आमिष दाखवले. 29 डिसेंबर 2022 रोजी गाडीलकर यांनी ट्रेडझ कंपनीच्या खात्यावर एनईएफटीद्वारे 1 लाख वर्ग केले. त्यानंतर पुन्हा 5 लाख 10 हजारांची गुंतवणूक केली. गाडीलकर यांचा विश्वास बसावा म्हणून संशयितांनी ठरल्याप्रमाणे गाडीलकर यांना भरघोस परतावा दिला. पुढे ट्रेडझ कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा आणि इतर संचालकांनी कथित ‘ब्रोकरेज प्लॅन’ समोर आणत त्यांना गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला. गाडीलकर अन् इतर गुंतवणुकदारांना सर्व आरोपींनी नफ्यातील काही टक्के व 10 ते 15 टक्क्यांचे आमिष दिले. याच आमिषाला 21 हजार 361 गुंतवणूकदार बळी पडले.
धनश्री-चहलच्या घटस्फोटामागचं खरं कारण समोर;पैसा अन् प्रॉपर्टी सोडताही कशावरून उडाले खटके?
संजय मोरे, आर्थिक सल्लागार सुरुवातीला गाडीलकर यांना गुंतवणुकीवर 5 ते 10 टक्के परतावा दिला गेला. पुढे ‘तुमच्या ओळखीतील लोकांनाही जोडा, त्यांचा नफा तुमच्यासोबत वाटू’ अशी ऑफर देण्यात आली. त्यामुळे गाडीलकर यांच्यासारखे गुंतवणूकदार या योजनेला बळी पडले. अनेकांना कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला चांगला परतावा मिळाल्याने कंपनीमध्ये गुंतवणूक वाढत गेली. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या खात्यांची माहिती अचानक इन्फिनिटीच्या पोर्टलवर वळवण्यात आली. त्यानंतर मात्र परतावा देण्यास टाळाटाळ, उडवाउडवी सुरू झाली. रक्कम परत मागितल्यावर उत्तर टाळली जाऊ लागली. श्रीगोंदे, सुपा तसेच पुणे येथे शाखा सुरू करून गुंतवणूकदारांना अशाच भूलथापा देत फसविण्यात आले.
महिन्याला भरघोस परताव्याचे आमिष दाखवल्याने शेवगाव, पाथर्डी, नगर, पारनेर अन् श्रीगोंदा येथील अनेक जण ट्रेड मार्केटिंगच्या विळख्यात सापडल्याचा प्रकार समोर येऊ लागला. बोगस कंपन्यांच्या खात्यातून अनेक महिन्यांपासून पैसे मिळत नसून गुंतवणूकदारांनी एजंट म्हणून मध्यस्थी असलेल्या लोकांच्या घरी चकरा मारणे सुरू केले.
पहिली, दुसरीला एकच कविता; शिक्षण विभागाचा नवा घोळ आला समोर, नेमकं प्रकरण काय?
नवनाथ अवताडे याने नवनवीन कंपन्या सुरू करून लोकांना गंडा घातला आहे. यापूर्वी श्रीगोंदा अन् तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आता सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अवताडे व त्याच्या साथीदारांनी इन्फिनेट, सिस्पे या कंपन्यांसह आता ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट’ या कंपनीमधून लोकांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. अवताडे अन् त्याच्या पंटरने राज्यभरात आणखी वेगवेगळ्या नावांनी कंपन्या सुरू करून लोकांना गंडा घातला आहे.
फरार भामटे अन् पोलिसांचे अर्थपूर्ण सहाय्य
जास्तीच्या परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची लुटमार करणारी सिस्पे ही काही पहिलीच कंपनी नाही. याआधी देखील नगर जिल्ह्यात अशा मल्टिनिधी कंपन्यांच्या माध्यमांतून अनेका कंपन्यांच्या टोळक्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांना चुना लावला आहे. यातील काही आजही पोलिस कोठडीत जेरबंद आहेत तर काही पसार आहेत. जे पसार आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आपला वेळ खर्च करत नाही. यात अर्थपूर्ण संबंध असल्याने पोलीस प्रशासन या भामट्यांना पकडत नाही, अशी चर्चा देखील गुंतवणूकदारांमध्ये आहे.