Ahilyanagar News : लुटीसाठी नेलं, ATM चा पिन चुकीचा दिला म्हणून एकाला संपविले!

Ahilyanagar News : लुटीसाठी नेलं, ATM चा पिन चुकीचा दिला म्हणून एकाला संपविले!

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलंय. दि. 22 जून रोजी केडगावच्या इंडस्ट्रियल परिसरातील मोकळ्या जागेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Video : गेल्या सहा वर्षात धाराशिव जिल्ह्यात आपण काय केल?, खासदार ओमराजेंनी यादीच वाचली

बोबडा अनारसिंग मध्यप्रदेश असं मृत व्यक्तीचं असून संबंधित व्यक्ती दि. 22 रोजी आरोपी संदेश संजय क्षेत्रे, अमन असीरमिया शेख, मंगेश कालीदत्त कांबळे, सर्व रा.केडगाव, अहिल्यानगर यांनी लुटण्याच्या उद्देशाने अनारसिंग यास गाडीवर बसवून केडगावच्या इंड्रस्ट्रियल परिसरात नेलं. त्याला मारहाण करुन त्याच्या खिशामधील एटीएम कार्ड पैसे घेतले. यावेळी अनारसिंग याला एटीएमच्या पिनची विचारण करीत संदेश क्षेत्रे हा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला. एटीएमचा पिनकोड चुकीचा असल्याने पैसे निघाले नाहीत. चुकीचा पिनकोड सांगितल्याने तीनही आरोपींनी अनारसिंग याची लाकडी काठी आणि दगडाने बेदम मारहाण करुन हत्या केली.

Santosh Deshmukh Case : मकोका हटवण्याचा वाल्मिक कराडचा डाव फसला! निकमांच्या युक्तिवादाने कोर्टात उलथापालथ

मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. या चौकशीअंती आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीद शेख, संदीप पवार, फुरकान शेख, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व भगवान धुळे यांनी गुन्ह्याचा उलगडा केला. दरम्यान, आरोपींना कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी करीत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube