‘सर्किट’ ची शेअर मार्केटमधून सुट्टी, भला मोठा दंड ठोकत SEBI ची अभिनेता अर्शद वारसीवर कारवाई

Arshad Warsi

Arshad Warsi : शेअर बाजार नियामक संस्था SEBI ने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी आणि भावाला एक वर्षासाठी सिक्योरिटी मार्केटमधून प्रतिबंधित केले आहे. अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि अन्य 58 लोकांवर सेबीने कठोर कारवाई केली आहे. या लोकांना आता शेअर बाजारात कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. अभिनेता अर्शद वारसीला हिंदी चित्रपटसृष्टीत सर्किट या नावानेच ओळखलं जातं. मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS) या चित्रपटात त्याने संजय दत्तचा सहकारी सर्किटची भूमिका साकारली होती.

सेबीने या लोकांवर एक वर्षांची बंदी घातली आहे. तसेच काही लोकांना पाच पाच लाखांचा दंडही ठोठावला आहे. साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड (Sadhna Broadcast Ltd-SBL) कंपनीच्या शेअर्समध्ये छेडछाड केल्याचे आढळून आल्याने सेबीने ही कारवाई केली आहे. सेबीनुसार या लोकांकडून कंपनीच्या शेअरच्या किंमतीत मनमानी वाढ करुन ते जास्तीच्या दरात विकण्याचा म्हणजेच पंप अँड सेल (डंप) करण्याचा आरोप आहे.

शेअर मार्केटमधून परताव्याचे अमिष; कोट्यावधींची फसवणूक करणारा भामटा गजाआड 

या फसवणुकीच्या प्रकाराला पंप अँड डंप स्कीम म्हणतात. ज्यामध्ये शेअर्सची किंमत वाढवली जाते आणि नंतर किंमत जास्त झाली की शेअर्स विकून नफा कमावला जातो. जेव्हा सामान्य गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतात तेव्हा मोठे गुंतवणूकदार ते जास्त किंमतीत विकतात आणि बाहेर पडतात. यामुळे लहान गुंतवणूकदारांचे मात्र मोठे नुकसान होते.

या योजनेद्वारे गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सेबीने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एकूण 58 यु्निट्सवर कारवाई केली आहे. यातील अनेक जणांवर एक ते पाच वर्षांची बंदी घातली आहे. या प्रकरणी शेअर बाजार नियामक मंडळाने सेबीला पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. साधना ब्रॉडकास्टच्या (आता क्रिस्टल बिजनेस सिस्टम लिमिटेड) प्रवर्तकांसह अन्य 57 संस्थांना पाच लाख ते पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या व्यतिरिक्त सेबीने चौकशी कालावधी संपल्यापासून प्रत्यक्ष पेमेंटच्या तारखेपर्यंत 12 टक्के वार्षिक व्याजासह 58.01 कोटी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेअर बाजाराला कोणाची नजर लागली? ‘या’ 5 कारणांमुळे गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले

व्हॉट्सअप चॅटद्वारे खुलासा

व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून खुलासा झाला की अर्शद वारसीला त्याची पत्नी आणि तिच्या भावाला 25-25 लाख रुपये ट्रान्सफर करण्याचा विचार होता. सेबीच्या अंतिम आदेशात सात व्यक्तींवर पाच वर्षांची बंदी आणि 54 जणांवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube