भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला, 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Indian Stock Market : इस्त्रायल, अमेरिका आणि इराण दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या युद्धाचा मोठा फटका भारतीय शेअर बाजारात

Indian Stock Market

Indian Stock Market : इस्त्रायल, अमेरिका आणि इराण दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या युद्धाचा मोठा फटका भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बसला आहे. आज शेअर बाजारात सेन्सेक्स 2 टक्क्यांहून अधिक घसरणीसह उघडल्याने 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज सेन्सेक्स 1572.86 अंकांनी घसरला तर निफ्टी 481.20 अंकांनी घसरून 24,385.50 वर पोहचली आहे. आज व्यवहाराच्या सुरुवातील सेन्सेक्स 1700 अंकांपेक्षा जास्त घसरले आहे.

सेन्सेक्स (Indian Stock Market) आज बुधवारी 2 टक्क्यांहून अधिक घसरणीनंतर 78528.82 अंकांनी उघडला आहे. निफ्टी 24,388.80 अंकांनी उघडला आहे. इन्फोसिस, एचसीएल (HCL) आणि टीसीएस वगळता, सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी 27 कंपन्यांचे शेअर्स घसरले. एल अँड टी चे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक घसरले. टाटा स्टीलचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले. होळीच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजार उघडला असून इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम बाजारावर होत आहे.

सोमवारी बाजारात मोठी घसरण

सोमवारी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली, बीएसई सेन्सेक्स 1,048 अंकांनी घसरला, तर एनएसई निफ्टी 575 अंकांनी घसरला. कमकुवत जागतिक बाजारपेठा आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात भांडवल बाहेर टाकल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 2,743.46 अंकांनी म्हणजेच 3.37 टक्क्यांनी घसरून 78,543.73 वर पोहोचला.

T20 World Cup 2026 आज पहिला सेमी फायनल सामना, भिडणार न्यूझीलंड- दक्षिण आफ्रिका; कोण मारणार बाजी?-

नंतर तो 1,048.34 अंकांनी म्हणजेच 1.29 टक्क्यांनी घसरून 80,238.85 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, व्यवहारादरम्यान, 50 शेअर्सचा एनएसई निफ्टी 575.15 अंकांनी म्हणजेच 2.28 टक्क्यांनी घसरून 24,603.50 वर बंद झाला. नंतर तो 312.95 अंकांनी म्हणजेच 1.24 टक्क्यांनी घसरून 24,865.70 वर बंद झाला.

follow us