Wipro, TCS, Infosys सह आयटी शेअर्स घसरले, गुंतवणूकदारांना मोठा धक्का; नेमकं कारण काय?
IT Stocks Down : भारतीय शेअर बाजारात आज (4 फेब्रुवारी) मोठ्या प्रमाणात आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आल्याने गुंतवणूकदारांना मोठा
IT Stocks Down : भारतीय शेअर बाजारात आज (4 फेब्रुवारी) मोठ्या प्रमाणात आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. बाजारात कालच्या तेजीनंतर आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो सारख्या प्रमुख आयटी शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. ही घसरण अमेरिकेतील बातम्या आणि जागतिक संकेतांमुळे असल्याची माहिती समोर येत आहे.
आयटी शेअर्स का घसरत आहेत ?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकन एआय स्टार्टअप अँथ्रोपिकने क्लाउडने एक नवीन व्हर्जन लाँच केले आहे. हे व्हर्जन कायदेशीर काम, कोडिंग आणि कॉर्पोरेट कामे ऑटोमॅटिक करण्यात सक्षम आहे. त्यामुळे गुंतवणूदारांना भीती आहे की, जर कंपन्या स्वत: अशी शक्तिशाली टूल ऑफर करणार असेल तर भारतीय आयटी कंपन्यांचे पारंपारिक व्यवसाय मॉडेल धोक्यात येऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदार आयटी कंपनीमधून गुंणतवणूक बाहेर काढत आहे.
नॅस्डॅक आणि वॉल स्ट्रीटवरील विक्री
काल रात्री, अमेरिकन बाजार, विशेषतः तंत्रज्ञानाने भरलेला नॅस्डॅक, सुमारे 1.4 % घसरून बंद झाला. जेव्हा प्रमुख अमेरिकन तंत्रज्ञान शेअर्स (जसे की एनव्हीडिया आणि मायक्रोसॉफ्ट) घसरतात तेव्हा त्याचा थेट परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर होतो, कारण त्यांच्या उत्पन्नाच्या 60-70% अमेरिकेतून येतात. चिप बनवणारी दिग्गज कंपनी एएमडीने भविष्यातील कमकुवत महसूलाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात घबराट निर्माण झाली आहे.
‘ट्रेड डील’ नंतर नफा बुकिंग
काल (3 फेब्रुवारी) भारत-अमेरिका व्यापार कराराच्या बातमीमुळे आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा नियम आहे की, जेव्हा एखादा शेअर वेगाने वाढतो तेव्हा मोठे गुंतवणूकदार दुसऱ्या दिवशी नफा बुक करतात, म्हणजेच शेअर्स विकतात. यामुळे किंमती घसरतात. आज आयटी क्षेत्रातही अशीच नफा बुकिंग दिसून येत आहे.
लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव? शरद पवार स्पष्टच बोलले…
घाबरण्याची गरज आहे का?
तज्ज्ञांचे मत आहे की, ही घसरण अल्पकालीन आहे. जरी एआय एक आव्हान राहिले असले तरी, भारतीय आयटी कंपन्या देखील एआयमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. इन्फोसिस आणि टीसीएससाठी आजची घसरण ही एक सुधारणा म्हणून देखील पाहिली जाऊ शकते.
