तिरुपतीकडे व्यवसायासाठी प्रार्थना, शेअर्स विकून कमवले 7 हजार कोटी अन् मंदिरात दान केलं 121 किलो सोने

Tirupati Temple : तिरुमला तिरुपती मंदिरात दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यापैकी अनेक जण मंदिरात दान देखील करतात. या मंदिरात अडाणी- अंबानीसारखे उद्योगपती देखील सोने किंवा हिऱ्यांचे दागिने दान म्हणून देतात. तर एका भक्ताने तिरुमला तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) 121 कोटी सोने (121 Gold KG) दान केले आहे. ज्यांची किंमत तब्बल 140 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी माहिती दिली आहे. ते गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू म्हणाले की, एका भक्ताने तिरुपतीला स्वता: चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रार्थना केली होती. त्याने व्यवसाय सुरु केला आणि त्यात यश मिळाले. यानंतर त्याने त्याच्या कंपनीचे शेअर्स विकून 6 ते 7 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आणि यानंतर त्याने मंदिराला 121 किलो सोने अर्पण केले. असं या कार्यक्रमात बोलताना चंद्रबाबू नायडू म्हणाले.
मंदिराला 121 किलो सोने दान
तिरुपती मंदिरात दररोज जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यापैकी अनेक जण मंदिरासाठी दान देखील देतात. तर आता व्यवसायाच बंपर नफा झाल्याने एका भक्ताने मंदिराला 121 किलो सोने दान केले आहे. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या मंदिराची मूर्ती दररोज 120 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जात आहे. याची माहिती घेत त्या भक्ताने मंदिराला 140 कोटी रुपयांचे 121 किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती देखील चंद्रबाबू नायडू यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.
यापूर्वी कोट्यवधी रुपयांचे देणगी
तिरुपती मंदिरासाठी यापूर्वी देखील कोट्यवधी रुपयांची देगणी मिळाली आहे. मे 2025 मध्ये उद्योगपती संजीव गोएंका यांनी 3.63 कोटी रुपयांचा हिऱ्याने जडलेला सोन्याचा हार दान केला होता. जुलै 2025 मध्ये, चेन्नईस्थित सुदर्शन एंटरप्रायझेसने 2.4 कोटी रुपयांचे 2.5 किलो सोने दान केले. तर निवृत्त आयआरएस अधिकारी वायव्हीएसएस भास्कर राव यांनी जानेवारी 2025 मध्ये मंदिर ट्रस्टला 3.66 कोटी रुपयांची मालमत्ता सुपूर्द केली होती.