ब्रेकिंग : आंध्र प्रदेशातील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात मोठा अपघात; चेंगराचेंगरीत अनेकांंचा मृत्यू

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरी आणि मृत्युंबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

  • Written By: Published:
ब्रेकिंग : आंध्र प्रदेशातील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात मोठा अपघात; चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

Stampede at Andhra Pradesh’s Venkateswara Swamy temple : आंध्र प्रदेशातील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले असून, चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नेमकी ही चेंगराचेंगरी (Stampede) कशामुळे झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, या घटनेत 9 भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे तर, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मंदिरात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार्तिक महिन्यामुळे मंदिरात (Venkateswara Swamy temple) मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. भाविकांची गर्दी इतकी वाढली की, स्थानिक प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन परिस्थिती नियंत्रित करू शकले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत 9 भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Stampede at Andhra Pradesh’s Venkateswara Swamy temple

माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर कडक नजर ठेवली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळपासूनच मंदिरात गर्दी वाढली होती आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. स्थानिक प्रशासनाने अपघाताची चौकशीचे आदेश दिले असून, गर्दी नियंत्रणात कुठे चूक झाली हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून शोक व्यक्त

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरी आणि मृत्युंबद्दल दुःख व्यक्त केले आहे. एक्सवर पोस्ट करताना नायडू यांनी लिहिले आहे की, श्रीकाकुलम जिल्ह्यातील वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीची हृदयद्रावक घटना घडली असून यात काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. सर्व पीडित आणि जखमींना त्वरित मदत करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचेही नायडू यांनी सांगितले आहे.

follow us