आंध्रप्रदेशात खाजगी बसला भीषण आग; 20 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

आंध्रप्रदेशातील तेलंगणामध्ये खाजगी बसला भीषण आग लागून 20 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याचं समोर आलंय.

Untitled Design

Andhra Pradesh : आंध्रप्रदेशातील तेलंगणामधील करनूरमध्ये एका खाजगी बसला भीषण (Andhra Pradesh Accident) आग लागल्याची घटना घडलीयं. दुजाकीच्या धडकेमुळे चालत्या बसला भीषण आग लागल्याने 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलंय. या घटनेबद्दल मुख्यमंत्र्‍यांसह राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी दुख: व्यक्त केलंय.

मुंबईची अवस्थाही झाली दिल्लीसारखीच! हवा बिघडली, मुंबईकरांच्या प्रकृतीला मोठा धोका

हैद्राबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या खाजगी बसला एका दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेनंतर खाजगी बसला आग लागली. या खाजगी बसमध्ये एकूण 42 प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

दरम्यान, आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे झालेल्या बस आगीच्या दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुर्दैवी आहे. अपघातग्रस्त कुटुंबियांप्रती मी मी दुख: व्यक्त करतो. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करीत असल्याचं ट्विट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलंय.

follow us