आंध्र प्रदेशात मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात कोसळली; 9 जणांचा मृत्यू

Chittoor Road Accident : आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात बस कोसळून किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि 22 जण जखमी झाले आहे.

  • Written By: Published:
Chittoor Road Accident

Chittoor Road Accident : आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात बस कोसळून किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि 22 जण जखमी झाले आहे. आज शुक्रवार पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास चिंतुरू आणि भद्राचलम दरम्यान बस खोल दरीत कोसळली. माहितीनुसार या बसमध्ये 35 प्रवाशी होते. ही बस भद्राचलम मंदिराचे (Bhadrachalam Temple) दर्शन घेतल्यानंतर अन्नावरमकडे जात होती.

पोलिसांनी सांगितले की, चित्तुरहून शेजारच्या तेलंगणाला जाणाऱ्या या बसमध्ये चालक आणि क्लीनरसह 37 प्रवासी (Chittoor Road Accident) होते. त्यापैकी सहा जणांना कोणतीही दुखापत झालेली नाही. पोलिस अधीक्षक अमित बर्दार यांनी सांगितले की, पहाटे 4: 30 वाजताच्या सुमारास चिंतुरू-मरेदुमिल्ली घाट रस्त्यावर दुर्गा मंदिराजवळ हा अपघात झाला.

बस घाट रस्त्यावरून पडल्याने किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि 22 जण जखमी झाले. बस पूर्णपणे दरीत पडली नाही अशी माहिती पोलिस अधीक्षक अमित बर्दार यांनी दिली. तर जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

मोठी बातमी! माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन

दाट धुक्यामुळे बस चालकाला अपघातस्थळी वळण दिसले नाही, जे मोथुगुडेम पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते. बसमधील प्रवासी चित्तूरहून तेलंगणातील भद्रचलम येथील श्री. राम मंदिराकडे जात होते अशी देखील माहिती पोलिस अधीक्षक अमित बर्दार यांनी दिली.

Ashutosh Kale : विरोधकांना पराभव दिसत असल्याने पातळी सोडून टीका; आमदार आशुतोष काळे स्पष्टच म्हणाले

follow us