धक्कादायक! लालबागच्या राजाच्या गेटजवळ भीषण अपघात, दोन चिमुकल्यांना चिरडले; एकाचा मृत्यू

Mumbai Accident News : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्साहानंतर आज लाडक्या गणरायाला वाजतगाजत निरोप दिला जात आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी आज सकाळपासूनच अवघा महाराष्ट्र रस्त्यावर लोटला आहे. याच उत्साहाच्या प्रसंगात एक दुर्दैवी घटना घडली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली आहे. लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात 2 वर्षांची चंद्र वजणदार हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ शैलू वजणदार (11) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळ येथील केईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान ही घटना (Mumbai Road Accident) घडली. रात्रीच्या वेळी दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपली होती. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने सरळ या मुलांच्या अंगावर गाडी घातली. नंतर तिथून तो पसार झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणरायाला निरोप देतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुसळधार पावसात भरधाव थारची रिक्षाला धडक! 5 जणांचा जागीच मृत्यू, चिपळूणमध्ये भीषण अपघात
मुंबईत हिट अँड रनच्या घटना (Mumbai Hit And Run) सातत्याने घडत असतात. रात्रीच्या वेळी भरधाव वेगात वाहने चालवून रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या किंवा येथे झोपलेल्या लोकांना चिरडले जाते. अशा घटना सतत घडत आहेत. वाहनांचा वेग जास्त असतो. बऱ्याचदा वाहनचालक मद्यपान केलेला असतो त्यामुळे अपघात होतात. या अपघातात निष्पाप लोकांचा बळी जात आहे.