प्रभासच्या ‘द राजा साब’ ट्रेलर लॉन्चचा महाउत्सव! आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील 105 थिएटर्समध्ये भव्य स्क्रीनिंग

प्रभासचा बहुप्रतिक्षित पॅन-इंडिया हॉरर-फॅन्टसी ड्रामा ‘द राजा साब’ प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करतो आहे.

The Raja Saab Trailer Launch

The Raja Saab Trailer Launch In 105 Theaters : प्रभासचा बहुप्रतिक्षित पॅन-इंडिया हॉरर-फॅन्टसी ड्रामा ‘द राजा साब’ प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करतो आहे. पहिली झलक आणि टीझरनंतर आता सगळ्यांच्या नजरा ट्रेलरकडे लागल्या होत्या आणि हा ट्रेलर आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता लॉन्च होणार आहे.

ट्रेलर लॉन्चचा महाउत्सव

या निमित्ताने आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) आणि तेलंगणातील (Telangana) तब्बल 105 सिनेमागृहांमध्ये एकाचवेळी ट्रेलरचं (The Raja Saab) भव्य स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, विशाखापट्टणम, तिरुपती, कुर्नूलसारख्या मोठ्या शहरांतील थिएटर्समध्ये प्रत्येकी 600 पेक्षा अधिक प्रेक्षक बसू शकतील. ते सर्व प्रभासच्या या पॅन-इंडिया सिनेमाचा उत्सव साजरा करतील. त्यामुळे ट्रेलर लॉन्च हा एकप्रकारे प्रभासच्या (Prabhas) चाहत्यांसाठी सणासुदीचा जल्लोष ठरणार आहे.

थिएटर्ससोबतच पीपल मीडिया फॅक्टरीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील ट्रेलर रिलीज केला (Entertainment News) जाणार आहे, जेणेकरून देशभरातील चाहते हा क्षण अनुभवू शकतील.

105 सिनेमागृहांमध्ये ट्रेलरचं भव्य स्क्रीनिंग

हा भव्य प्रकल्प टीजी विश्व प्रसाद यांच्या पीपल मीडिया फॅक्टरी या बॅनरखाली निर्मित असून पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम. संगीत दिग्दर्शक थामन एस यांची गाणी, अद्वितीय दृश्यवैशिष्ट्यं आणि प्रभासचा करिष्मा यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांसाठी वेगळाच अनुभव ठरणार आहे.

दिग्गज कलाकारांचा मोठा ताफा

‘द राजा साब’मध्ये प्रभाससोबतच दिग्गज कलाकारांचा मोठा ताफा झळकणार आहे. यात संजय दत्त, जरीना वहाब, निधी अ‍ॅगरवाल, मालविका मोहनन, बोमन इराणी आणि ऋद्धी कुमार यांचीही महत्वाची पात्रं आहेत. निर्माते टीजी विश्व प्रसाद आणि कृति प्रसाद यांनी या महाकाय सिनेमाला भव्य स्वरूप दिलं असून, ‘द राजा साब’ प्रेक्षकांसाठी भय, कॉमेडी आणि प्रभासच्या अॅक्शनचा भन्नाट संगम घेऊन सज्ज झाला आहे.

follow us