मराठी मनोरंजन विश्वात सुंदर योग! नव्या कलाकृतीसाठी मनवा नाईक-गौरी कालेलकर-चौधरी एकत्र
Marathi Film निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
Manwa Naik-Gauri Kalelkar-Chaudhary together for a new Marathi Film : सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय! निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.
राम सातपुतेंना वचपा काढला; जानकरांचा मुलगा, अर्जुनसिंह मोहितेही पराभूत
माघी गणेश जयंतीचा शुभमुहूर्त साधत, गणरायाच्या चरणी त्यांनी आपल्या आगामी कलाकृतीची मुहूर्तमेढ रोवली. शुभारंभ शुभदिनी हा क्षण त्यांच्या नव्या प्रवासाचा नवा अध्याय ठरणार आहे.‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या बॅनरखालील ह्या आगामी मराठी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मनवा नाईक करणार आहेत. दमदार संहिता, ताजं कथानक आणि भक्कम टीमवर्कच्या जोरावर ही कलाकृती प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
कारेगाव पंचायत समितीत मनीषा पाचंगे यांच्याकडून निर्मला नवले यांचा दारुण पराभव
अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून मनवा हिने आजवर उत्तम कलाकृती दिल्या आहेत. ‘पोर बाजार’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘सरस्वती’ या मालिकांची तसेच वेबसिरीजची निर्मिती केली आहे.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली, जिल्हा परिषदेला मुलगा आमेर विजयी
‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या चित्रपटात तसेच हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या निर्माती गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ या गाजलेल्या मराठी चित्रपटासोबत ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाटिकेची निर्मिती केली आहे.
या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना गौरी कालेलकर-चौधरी म्हणाल्या, “एक उत्तम संहिता माझ्याकडे आली आणि निर्माती म्हणून ती कलाकृती करावी असं मनापासून वाटलं. मनवा लेखिका-दिग्दर्शिका म्हणून माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली. आमच्या टीमवर्कमधून रसिकांना एक दर्जेदार अनुभव देण्याचा आम्हाला विश्वास आहे.”ही नवीन कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारी बातमी ठरणार आहे!
