Prabhas: प्रभास कधी करणार लग्न?, अखेर अभिनेत्याच्या कुटुंबातील सदस्याने दिली हिंट

Prabhas: प्रभास कधी करणार लग्न?, अखेर अभिनेत्याच्या कुटुंबातील सदस्याने दिली हिंट

Prabhas Wedding: अभिनेता प्रभास (Prabhas ) हा कायमच चर्चेत असतो. प्रभासची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रभासचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. (Prabhas Wedding) चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभास त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणतीही अपडेट समोर येताच चाहत्यांमध्ये उत्साह संचारतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


आता प्रभासचे काका आणि दिग्गज अभिनेते कृष्णन राजू यांची पत्नी श्यामला देवी यांनी त्यांच्या लग्नाबाबत संकेत दिले आहेत. त्यांच्या लग्नाचे संकेत मिळताच चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत. विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिराच्या भेटीदरम्यान, प्रभासच्या काकूंनी मीडियाशी संवाद साधला आणि त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा केली.

लवकरच लग्नाची घोषणा करणार

मिळालेल्या माहितीनुसार प्रभासच्या लग्नाच्या घोषणेची प्रतीक्षा आता संपणार आहे. लवकरच लग्नाची घोषणा होणार आहे. मात्र, जेव्हा श्यामला देवी यांना प्रभासच्या भावी पत्नीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यावर मौन बाळगले.

आता चाहते सोशल मीडियावर प्रभासच्या लग्नाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याआधी श्यामला देवी म्हणाल्या होत्या की, संपूर्ण कुटुंबाला प्रभासने लग्न करावे असे वाटते. मात्र, योग्य वेळ आल्यावर ते होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Prabhas Wedding: प्रभासचं ठरलं! ‘बाहुबली’ फेम लवकरच चढणार बोहल्यावर?

प्रभासच्या लग्नाबाबत गदारोळ होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हैदराबादमध्ये कल्की 2898 एडी कार्यक्रमादरम्यान प्रभासने अशा अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता- ‘मी लवकरच लग्न करणार नाही कारण मला माझ्या महिला चाहत्यांच्या भावना दुखावायच्या नाहीत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रभासचा कल्की 2898 एडी काही काळापूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube