शेअर बाजारात गुंतवणूक करताय? सोशल मीडियावरील फेक मार्केट एक्सपर्टपासून सावध राहा, SEBI चा मोठा इशारा!

सोशल मीडियावरील कोणत्याही व्यक्तीच्या सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी सावध राहण्याचे आवाहन बाजार नियामक सेबीने केले आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 31T183007.874

Beware of fake market experts on social media : शेअर बाजारात गुंतवणूक करून कमी वेळेत मोठा नफा कमावण्याची इच्छा अनेकांना असते. मात्र, याच अपेक्षांचा फायदा घेत सोशल मीडियावर अनेकजण स्वतःला मार्केट एक्सपर्ट किंवा गुंतवणूक सल्लागार असल्याचे भासवतात. आकर्षक दावे, मोठ्या परताव्याचे आमिष आणि खास गुंतवणूक टिप्सच्या नावाखाली सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही व्यक्तीच्या सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी सावध राहण्याचे आवाहन बाजार नियामक सेबीने केले आहे. सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी पत्रकार परिषदेत अनधिकृत सोशल मिडियाच्या इन्फ्लुएन्सर्सबाबत गुंतवणूकदारांना सतर्क केले.

सेबीकडे नोंदणी नसताना देखील काही व्यक्ती शेअर बाजारातील तज्ज्ञ असल्याचा दावा करतात. हे लोक सोशल मीडियाच्य माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रभावित करतात आणि त्यांनंतर आपल्या खास ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा प्रीमियम मेंबरशिप घेण्यासाठी आकर्षित करतात. या मेंबरशिपच्या बदल्यात त्यांच्याकडून मोठी रक्कम आकारली जाते. गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील टिप्स, विशेष मार्गदर्शन किंवा अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, अशा व्यक्तींकडे सेबीची आवश्यक नोंदणी नाव अधिकृत परवानगी आहे का, हे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे. केवळ सोशल मीडियावरील लोकप्रियता, फॉलोअर्सची संख्या किंवा आकर्षक नफ्याचे दावे पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नये. मेंबरशिपसाठी पैसे भरताना संबंधित व्यक्तीची विश्वासार्हता आणि नोंदणी तपासली नाही, तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करा! जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

सेबीने अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी केवळ फेक मार्केट एक्सपर्टच नव्हे, तर कमी किमतीच्या पेनी स्टॉक्सबाबतही गुंतवणूकदारांना सावध केले आहे. कमी किमतीत जास्त शेअर्स खरेदी करता येतात आणि भविष्यात मोठा नफा मिळेल, या अपेक्षेने अनेक छोटे गुंतवणूकदार अशा शेअर्सकडे आकर्षित होतात. मात्र, प्रत्येक स्वस्त शेअर चांगली गुंतवणूक असेलच असे नाही. काही कंपन्यांमध्ये अनेक वर्षांपासून कोणतेही ठोस व्यावसायिक कामकाज सुरू नसते. तरीही त्यांचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध असतात. अशा कंपन्यांची आर्थिक स्थिती, प्रत्यक्ष व्यवसाय आणि आर्थिक अहवाल तपासल्याशिवाय गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केवळ शेअरची किंमत कमी आहे म्हणून तो खरेदी करणे टाळावे. कंपनीची पार्श्वभूमी आणि आर्थिक स्थिती समजून घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा, असा महत्त्वाचा संदेश या इशाऱ्यातून मिळतो.

दीर्घकाळ व्यवसाय बंद असलेल्या किंवा प्रत्यक्ष कामकाज न करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांसमोर धोका निर्माण होऊ शकतो. अशा कंपन्यांबाबत नियामक प्रक्रिया अधिक प्रभावी आणि वेगवान करण्याची गरज असल्याचे सेबी अध्यक्षांनी स्पष्ट केले. गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करणे आणि आवश्यक कारवाई वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निष्क्रिय कंपन्यांच्या शेअर्सबाबत नियामक यंत्रणा अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे.

दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी शरद पवार मैदानात; पुढील तीन दिवस चार जिल्ह्यांचा दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद!

दरम्यान, सोशल मीडियावर अनधिकृत गुंतवणूक सल्ला आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी सेबी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची मदत घेतली जाणार असल्याचे तुहिन कांत पांडे यांनी सांगितले. AI च्या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संशयास्पद हालचाली आणि अनधिकृत गुंतवणूक सल्ल्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होऊ शकते. विशेषतः सेबीकडे नोंदणी नसताना गुंतवणूक सल्ला देणाऱ्या किंवा मेंबरशिपच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सेबीच्या या प्रयत्नांमुळे ऑनलाइन गुंतवणूकविषयक फसवणूक रोखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

शेअर बाजारात नफा मिळवण्याची संधी असली, तरी त्यामध्ये जोखीमही असते. त्यामुळे सोशल मीडियावरील मोठ्या नफ्याच्या हमींना बळी पडू नका. गुंतवणूक सल्ला देणाऱ्या व्यक्तीची सेबी नोंदणी तपासा, कोणत्याही पेड ग्रुप किंवा मेंबरशिपसाठी पैसे देण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता पडताळा आणि पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती समजून घ्या. केवळ व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा सोशल मीडिया टिप्सवर अवलंबून गुंतवणुकीचा निर्णय घेण्याऐवजी योग्य माहिती, अभ्यास आणि अधिकृत सल्ल्याच्या आधारेच गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

follow us