Andhra Pradesh Rain: पावसाचा हाहाकार, आंध्र प्रदेशात भूस्खलनामुळे 4 जणांचा मृत्यू

Andhra Pradesh Rain: पावसाचा हाहाकार, आंध्र प्रदेशात भूस्खलनामुळे 4 जणांचा मृत्यू

Andhra Pradesh Rain: गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील काही भागात (Andhra Pradesh Rain) मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे मुघलराजपुरम भागात भूस्खलन झाले असून यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, या भागात भूस्खलनामुळे मृतांच्या घरांवर मोठमोठे दगड पडले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N Chandrababu Naidu) यांनी भूस्खलनग्रस्तांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मोगलराजपुरम, विजयवाडा (Vijayawada) येथे भूस्खलन झाले त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात येत आहे. असं चंद्राबाबू नायडू यांनी निवेदनात म्हटले आहे.

पैसे तयार ठेवा, सप्टेंबरमध्ये बाजारात येत आहे ‘ह्या’ शानदार बाइक्स; पहा संपूर्ण लिस्ट

तर दुसरीकडे पुढील काही दिवस आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भूस्खलनाच्या प्रवण ठिकाणांहून लोकांना दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला होणार नाही मतदान; जाणून घ्या नवीन तारीख

follow us
  • fb
  • instagram
  • youtube