निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला होणार नाही मतदान; जाणून घ्या नवीन तारीख

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला होणार नाही मतदान; जाणून घ्या नवीन तारीख

Haryana Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत हरियाणा विधानसभा (Haryana Election 2024) निवडणुकीसाठी तारीख बदलेली आहे. आता हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होणार नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता 5 ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेसाठी मतदान होणार आहे तर 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. याच बरोबर जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा (Jammu and Kashmir Election) निकाल देखील 8 ऑक्टोबरला जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

बिष्णोई समाजाच्या मतदानाचा हक्क आणि परंपरा या दोन्हींचा आदर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं देखील निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 01 ऑक्टोबरची तारीख बदल्यात यावी यासाठी निवेदन दिले होते.

पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील बिष्णोई समाजाच्या लोकांना राजस्थानमधील मुक्कामी गावात वार्षिक उत्सव “असोज” साजरा करण्यासाठी 01 ऑक्टोबरला राजस्थानला जाणार आहे त्यामुळे अनेकांना मतदान करण्याची संधी मिळणार नाही त्यामुळे मतदानाचा दिवस बदल्यात यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने (Election Commission) हा निर्णय घेतला असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

‘पैलवान कुस्ती खेळतात खेळू द्या’, आव्हाडांचा अजित पवारांसह सावंतांना टोला

तर यापूर्वी भाजपकडून देखील 01 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका अन्य तारखेला घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. भाजपने 01 ऑक्टोबरपूर्वी आणि नंतरच्या सुट्टय़ांचा हवाला देत ही मागणी केली होती.

तर दुसरीकडे यापूर्वी हरियाणामध्ये 01 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 04 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार होते मात्र आता 05 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 08 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube