हरियाणात एमपी अन् राजस्थानचा डाव, भाजपाचे खासदार पुन्हा मैदानात; प्लॅनिंग काय?
Haryana Assembly Elections 2024 : कोणत्याही परिस्थितीत हरियाणाची सत्ता राखायचीच या (Haryana Assembly Elections 2024) इराद्याने भाजपने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने तिकीट वाटपासाठी राजस्थान आणि मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) फॉर्म्युला येथे राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झटका बसल्याने (Lok Sabha Elections) भाजप आता एकदम सावधपणे रणनीती आखत आहे. मागील अडीच महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी राज्यात फिरून अनेक नव्या योजनांची घोषणा केली. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपच्या (BJP) लक्षात आले आहे की काँग्रेसकडून जोरदार आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
भाजपने नक्की काय ठरवलं
भाजप यंदा राज्यातील आपल्या सगळ्याच खासदारांना निवडणुकीत उतरवण्याच्या बेतात आहे. लोकसभेचे पाच आणि राज्यसभेचे तीन असे एकूण आठ खासदार आहेत. तर किरण चौधरी राज्यसभेत जाणार आहेत. अशा परिस्थितीत खासदारांचा आकडा नऊ झाला आहे. मध्यामांत आलेल्या वृत्तांनुसार भाजपने आपल्या सर्व खासदारांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची गुरुग्राम येथे तातडीची बैठक झाली. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. यानंतरच अशी चर्चा सुरू झाली की भाजप आपल्या खासदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची तयारी करत आहे.
हिशोब होणारच, माफी नाही; लोकसभेच्या पराभवाची सल कायम, नवनीत राणांकडून बच्चू कडू टार्गेटवर
लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांप्रमाणेच पराभूत झालेल्या उमेदवारांनाही तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने भाजप अत्यंत अचूक रणनितीसह निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी करत आहे.
चार राज्यांत 21 खासदारांना तिकीट
भाजपने मागील वर्षात मध्य प्रदेश, राजस्थान, छतीसगड, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत याच फॉर्म्युल्यावर काम केले होते. या चार राज्यांत भाजपने एकूण 21 खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवले होते. राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी 7-7 खासदारांना तिकीट दिले होते. छातीसगडमध्ये चार आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Elections) तीन खासदारांना तिकीट देण्यात आले होते.
पार्टीचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरला होता. छत्तीसगढ आणि राजस्थानात भाजपने काँग्रेसला सत्तेतून (Congress Party) बेदखल करत घवघवीत यश मिळवले होते. मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता राखण्यात यश मिळाले होते. तेलंगणात मात्र हा प्लॅन फसला. येथे सरकार आले नाहीच शिवाय ज्या तीन खासदारांना तिकीट देण्यात आले होते त्या सगळ्या खासदारांचा निवडणुकीत पराभव झाला. हिंदी भाषक राज्यांत मात्र भाजपाचा हा प्रयोग यशस्वी ठरला. या 21 मधील 12 खासदारांनी विजय मिळवला होता.
भाजपला कुठे मिळू शकतो फायदा
हरयाणातील गुरुग्राम येथील खासदार राव इंद्रजित सिंह दक्षिण हरयाणातील (Haryana Politics) दिग्गज नेते आहेत. या प्रदेशात गुडगाव, रेवाडी आणि महेंद्रगढ जिल्ह्यातील अकरा मतदारसंघ येतात. या सर्व मतदारसंघात राव इंद्रजित सिंह यांच्या समर्थकांची चांगली संख्या आहे. त्यामुळे जर राव इंद्रजित सिंह यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली गेली तर या भागातील सर्वच मतदारसंघांत त्यांचा प्रभाव राहील.
कोणता CM बेस्ट, कुणाचं घटलं वजन? CM शिंदेंचा नंबर कितवा.. सर्व्हेतून धक्कादायक माहिती
खट्टर उतरले तर करनाल, कुरुक्षेत्र अन् अंबालात परिणाम
करनालचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर राज्यात (Manohar Lal Khattar) साडेनऊ वर्षे भाजपाचा प्रमुख चेहरा राहिले आहेत. आता खट्टर केंद्रात मंत्री आहेत. पण भाजपने त्यांना जर पुन्हा विधानसभा निवडणुकीत उतरवले तर अंबाला जिल्ह्यासह करनाल आणि कुरुक्षेत्र जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात भाजपला फायदा मिळू शकतो. या तीन जिल्ह्यांत विधानसभेच्या एकूण 13 जागा आहेत.
फरिदाबादचे खासदार कृष्णपाल गुर्जर यांना उमेदवारी दिली गेली तर भाजपला फरिदाबाद जिल्ह्यातील सहा मतदारसंघात फायदा होईल तसेच पलवल जिल्ह्यातील तीन मतदारसंघात फायदा होण्याची शक्यता आहे. कारण फरिदाबाद लोकसभा मतदारसंघात फरिदाबाद आणि पलवल जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येतात.
कुरुक्षेत्र मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले नवीन जिंदाल विजयी झाले आहेत. जर जिंदाल विधानसभा निवडणुकीत उतरले तर कुरुक्षेत्र प्रमाणेच हिसारमध्येही भाजपला फायदा मिळू शकतो. जिंदाल परिवाराचा हिसारमध्येही प्रभाव आहे. नवीन जिंदाल यांच्या मातोश्री सावित्री जिंदाल आणि वडील ओपी जिंदाल हिसारचे आमदार राहिले आहेत. भिवानी महेंद्र गढ येथील खासदार चौधरी धर्माबीर सिंह जुने नेते आहेत. जर त्यांना सुद्धा या निवडणुकीत तिकीट देण्यात आलं तर भिवानी महेंद्रगढ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विजय मिळू शकतो असे भाजपचे गणित आहे.
इलेक्शनआधी दलबदलूंचं टेन्शन! तिकीटासाठी गर्दी अन् धक्कातंत्राची तयारी; हरियाणात काय घडतंय?
किरण चौधरींचं काय?
किरण चौधरी जर विधानसभा निवडणूक लढल्या तर भिवानी महेंद्रगढ मधील विधानसभा जागांबरोबर चरखी दादरी आणि भिवानीमधील काही मतदारसंघात भाजपला फायदा मिळू शकतो. किरण चौधरी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या सून आहेत. किरण चौधरी स्वतः पाच वेळेस आमदार राहिल्या आहेत. तसेच हरयाणा सरकारमध्ये मंत्री आणि काँग्रेसमध्ये असताना विधिमंडळाच्या नेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
या व्यतिरिक्त भाजपचे राज्यसभा खासदार सुभाष बराला हरयाणात पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना जर भाजपने तिकीट दिले तर फतेहाबाद जिल्ह्यातील तीन मतदारसंघात भाजपला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. कृष्ण लाल पंवार पानिपत जिल्ह्यातील इसरानाचे आमदार राहिले आहेत. पंवार या भागातील आसपासच्या जागांवर प्रभाव टाकू शकतात. आणखी एक राज्यसभा खासदार रामचंद्र जांगड यांनी गोहाना विधानसभा निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पराभूत उमेदवारनांही मिळणार तिकीट
लोकसभा निवडणुकीत रोहतकमधून पराभूत झालेल्या डॉ. अरविंद शर्मा, हिसार मधून पराभूत झालेले रणजित चौटाला, अंबालातून पराभूत बंतो कटारिया आणि सिरसामधून पराभूत झालेले अशोक तंवर यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळू शकते. सोनीपत लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडौली राई मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. आता जर भाजपने या सर्व नेत्यांना मैदानात उतरवले तर लढत अटीतटीची होणार यात शंका नाही.